• Download App
    BJP MLA Gopichand Padalkar Attacks Owaisi: 'Will Bury Jihadi Offspring'; Insists on Ahilyanagar, Not Ahmednaga जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू; r

    Gopichand Padalkar : जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू; असदुद्दीन ओवेसींवर गोपीचंद पडळकर यांचा पलटवार

    Gopichand Padalkar

    विशेष प्रतिनिधी

    अहिल्यानगर : Gopichand Padalkar आयएमआयएमचे प्रमुख नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून ओवेसींनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान अहमदनगर असा उल्लेख वारंवार झाला, तर शेवटी त्यांनी आय लव्ह मोहम्मदचा नारा देत भाषण संपवले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओवेसींवर आणि एआयएमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल करत जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू असा इशारा दिला आहे.Gopichand Padalkar

    ओवेसींच्या सभेत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. त्यांच्या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अन्यायकारक कारभार, महागाई, बेरोजगारी आणि मुस्लिम समाजावरील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, ओवेसींच्या तोंडून वारंवार अहमदनगरचा उल्लेख झाल्याने पडळकरांसह भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.Gopichand Padalkar



    अहमदनगर नव्हे, अहिल्यानगरच म्हणावे लागेल

    गोपीचंद पडळकर यांनी ओवेसींवर टीका करत म्हटले, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाही यांनी हिंदू समाजावर अमानुष अत्याचार केले. मात्र आज काही जिहादी विचारसरणीचे लोक त्याच सुलतानशाहींचे गौरवगान करत आहेत. हे लोक देशविघातक वृत्तीचे आहेत. अशा जिहादी औलादांना गाडल्याशिवाय भगवा फडकणार नाही. अहिल्यादेवी होळकरांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे नेली. त्यांनी जनतेला मायेचा आधार दिला, स्त्रियांसाठी, शेतकऱ्यांसाठी असंख्य उपक्रम राबवले. अशा महान अहिल्यादेवींच्या नावाने शहराचे नामकरण झाले आहे. त्यामुळे अहमदनगर नव्हे, आम्हाला अहिल्यानगरच म्हणावे लागेल. अहमदविषयी कोणाला प्रेम असले तरी शहराचे नाव बदलणार नाही. ज्यांना या नावाचा त्रास होतो ते देशविरोधी असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

    जिहादी कुत्री कितीही जमली तरी नाव पुसू शकणार नाहीत

    ओवेसींच्या सभेत अहमदनगरचा उल्लेख झाल्याने पडळकर म्हणाले की, काल काही जिहादी कुत्री एकत्र झाली होती. त्यांनी कितीही सभा घेतल्या, तरी ते अहिल्यानगर हे नाव पुसू शकत नाहीत. ईश्वरपूर, संभाजीनगर, अहिल्यानगर ही नावे आमच्या श्रद्धेचा भाग आहेत.

    जय शिवरायच्या घोषणेने रंगली एआयएमआयएम सभा

    दरम्यान, एआयएमआयएमच्या सभेत एक वेगळाच प्रसंग घडला. एआयएमआयएम पक्षाच्या महिला पदाधिकारी रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जय शिवरायच्या घोषणेने केली. त्यांच्या या घोषणेनंतर काहींनी आश्चर्य व्यक्त केले, तर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष झाला. रुहीनाज शेख म्हणाल्या की, काहींना वाटले असेल की, एक बुरखेवाली महिला जय शिवराय कसं म्हणू शकते? पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. त्या स्वराज्यात सर्व जाती, धर्मांना स्थान होते. आज काही लोक मुसलमानांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही.

    राजकीय वातावरण तापले

    ओवेसींच्या भाषणावरून आणि पडळकरांच्या प्रत्युत्तरावरून अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. ओवेसींच्या सभेतील अहमदनगर उच्चारावरून भाजपने राष्ट्रभक्तीचा मुद्दा उचलला आहे, तर एआयएमआयएम कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याला धार्मिक द्वेष पसरवणारे म्हणत आहेत. पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

    BJP MLA Gopichand Padalkar Attacks Owaisi: ‘Will Bury Jihadi Offspring’; Insists on Ahilyanagar, Not Ahmednagar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    OBC Maha Morcha, : ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही; ओबीसी महामोर्चात विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

    जातींच्या अस्मिता भडकवून अखंड हिंदू समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा; प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींचे परखड आवाहन

    मनोज जरांगेंनी तोफ काँग्रेसकडे वळविली; पक्षाच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवली!!