• Download App
    Gopichand Padalkar शरद पवार जातीयवादाच विद्यापीठ,पुरोगामीपणाच्या बाता आणि जातीयवादीच्याच चर्चा

    Gopichand Padalkar : शरद पवार जातीयवादाच विद्यापीठ,पुरोगामीपणाच्या बाता आणि जातीयवादीच्याच चर्चा, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जसा बाप तशीच लेक असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंच्या विधानावरून गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Gopichand Padalkar criticises Sharad Pawar and Supriya Sule

    पडळकर म्हणाले, जरांगे, शिंदे आणि पवार हे तिघही मराठा आहेत आणि देवेंद फडणवीस ब्राम्हण जातीचे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच नाव घेऊन इथ महायुती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

    शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ आहे , असा आरोप करत ते म्हणाले, सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळ शिकल्या आहेत. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक आहे. पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादीच्याच चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुनेच फॅार्म्यूले आहेत.

    सुप्रिया सुळे अजित पवारांवर सहानुभूती दाखवू नका अस बोलतात. अजित पवार तिकड लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत .पण सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘ किडकी बहिण ‘ महाराष्ट्राला दाखवत आहेत , असा टोला त्यांनी लगावला.

    Gopichand Padalkar criticises Sharad Pawar and Supriya Sule

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात भाजप – शिंदे सेनेच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर; एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव!!

    Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

    तुतारीवाले स्वतःचेच ऑपरेशन करतील; घड्याळाच्या नेत्याने सांगितले राजकीय सत्य!!