विशेष प्रतिनिधी
मुंबई : जसा बाप तशीच लेक असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंच्या विधानावरून गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Gopichand Padalkar criticises Sharad Pawar and Supriya Sule
पडळकर म्हणाले, जरांगे, शिंदे आणि पवार हे तिघही मराठा आहेत आणि देवेंद फडणवीस ब्राम्हण जातीचे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच नाव घेऊन इथ महायुती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
शरद पवार हे जातीयवादाच विद्यापीठ आहे , असा आरोप करत ते म्हणाले, सुप्रिया सुळे ह्या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळ शिकल्या आहेत. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करूच नका. जसा बाप तशीच लेक आहे. पुरोगामीपणाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादीच्याच चर्चा घडवायच्या हे पवारांचे जुनेच फॅार्म्यूले आहेत.
सुप्रिया सुळे अजित पवारांवर सहानुभूती दाखवू नका अस बोलतात. अजित पवार तिकड लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत .पण सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘ किडकी बहिण ‘ महाराष्ट्राला दाखवत आहेत , असा टोला त्यांनी लगावला.
Gopichand Padalkar criticises Sharad Pawar and Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा