• Download App
    Padalkar Offers ₹11 Lakh Reward to "Beat Up" Priests; Christians Protest 'पादरी'चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस;

    Gopichand Padalkar : ‘पादरी’चे सैराट करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस; गोपीचंद पडळकरांचे ख्रिश्चन धर्मगुरूविरोधात वादग्रस्त विधान

    Gopichand Padalkar

    विशेष प्रतिनिधी

    जालना : Gopichand Padalkar  बैलगाडीच्या शर्यतीत जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ख्रिश्चन धर्मियांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी ख्रिश्चन धर्मियानी सोमवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढला.Gopichand Padalkar

    सांगली येथील यशवंत नगर येथे गत आठवड्यात सासरच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे नामक 7 महिन्यांच्या गरोदर महिलेने आत्महत्या केली होती. नंतर ही घटना धर्मांतराच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानाचे सोमवारी जालन्यात तीव्र पडसाद उमटले. येथील ख्रिश्चन बांधवांनी सोमवारी शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. त्यात पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मोर्चाला दलित संघटनांनीही पाठिंबा दिला. सरकारने गोपीनाथ पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर या प्रकरणी विभागीय पातळी ते दिल्लीपर्यंत मोर्चे काढले जातील, असा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. या मोर्चाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.



    अहिल्यानगर येथेही निघाला होता मोर्चा

    उल्लेखनीय बाब म्हणजे ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूंविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी गत गुरुवारी अहिल्यानगर येथेही मोर्चा काढण्यात आला होता. गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ख्रिश्चन धर्मगुरूंना मारणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली. हा प्रकार संविधानावर आघात करणारा आहे.

    धर्मांतराच्या कथित प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे. संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपीस शिक्षा व्हावी ही ख्रिस्ती समाजाची मागणी आहे. पण त्या घटनेचे भांडवल करून एकूण ख्रिस्ती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे गैर आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे ख्रिस्ती बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले होते.

    काय म्हणाले होते पडळकर?

    गोपीचंद पडळकर म्हणाले होते की, सांगली येथे एका महिलेवर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला. तिच्या पोटात 6 महिन्यांचे बाळ होते. तिच्या घरात मोबाईल फुटला तरी ख्रिश्चन पादरी तिला दोष देत होते. ती हिंदू रितीरिवाज पाळते. ती सैतान आहे. तिच्यामुळेच तुमच्या घरात नुकसान होत आहे, असे तो सांगत असे. त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिच्या पोटातील बाळावर हिंदू नव्हे तर ख्रिश्चन पद्धतीने गर्भसंस्कार करण्यासाठी दबाव टाकला. त्यातून तिने आत्महत्या केली. ही जबरदस्ती करणे योग्य आहे का? या ख्रिश्चन पादरीवर गुन्हा दाखल करायचा नाही का? तुम्ही गावोगावी जाता. फसवता. आमिष दाखवून लोकांचे धर्मांतर करता. हे योग्य नाही. सदर महिलेचा अशा पद्धतीने खून झाला असताना आम्ही भूमिका घ्यायची नाही का?

    या लोकांनी गावोगावी जाऊन धर्मांतर करण्याचे आपले उद्योग बंद करावेत. आम्ही कुणावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत नाही. जबरदस्ती करत नाही. त्यामुळे इतर कुणीही यासंबंधी जबरदस्ती करण्यासाठी गावात येऊ नये. आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला 5 लाख, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाख, तिसऱ्याला ठोकेल त्याला 3 लाख व जो कुणी पादरीचा सैराट करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे, असे पडळकर म्हणाले होते.

    Padalkar Offers ₹11 Lakh Reward to “Beat Up” Priests; Christians Protest

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ravindra Chavan भाजपा हीच माझी ओळख म्हणणारे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी!!

    कटू इतिहास विसरून ठाकरे बंधू एकत्र; पण भाजप मधले जुने शिवसैनिक अस्वस्थ!!

    Eknath Shinde : विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना कानपिचक्या