• Download App
    गुगलचा यूटर्न : मॅपवर संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवचे केले उस्मानाबाद|Google's Uturn Sambhajinagar's Aurangabad on the map, Dharashiv's Osmanabad

    गुगलचा यूटर्न : मॅपवर संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, धाराशिवचे केले उस्मानाबाद

    प्रतिनिधी

    औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराची घोषणा करताच गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये या दोन्ही शहरांच्या बदललेल्या नावाचा अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव असा उल्लेख केला होता. विधिमंडळ व केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिलेली नसल्याने अद्याप नामांतरावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही ‘गुगल’ने एवढी घाई का केली, असा प्रश्न नेटिझन्सकडून विचारला जात होता.Google’s Uturn Sambhajinagar’s Aurangabad on the map, Dharashiv’s Osmanabad



    काहींनी मात्र गुगलच्या या कृतीचे समर्थनही केले होते. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘गुगल’ला या कृतीबद्दल जाब विचारून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. नामांतरविरोधी कृती समितीनेही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मात्र नमते घेत गुगलने तातडीने सर्च इंजिनमधून संभाजीनगर व धाराशिवचा उल्लेख काढून टाकला.

    आता दोन्ही शहरांच्या नावापुढे पूर्वीप्रमाणे औरंगाबाद व उस्मानाबाद अशीच नोंद दिसत आहे.

    Google’s Uturn Sambhajinagar’s Aurangabad on the map, Dharashiv’s Osmanabad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    BJP Navnath Ban : केदारनाथ नको, औरंगजेबाच्या कबरीवर जा!:संजय राऊतांवर भाजपची सडकून टीका

    Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची पत्रकार परिषद; इंडिया आघाडी आणि उद्धव ठाकरेंवरही टीका

    Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत अब्दुल सत्तारांना मोठा धक्का! मुलगा समीरचा अर्ज बाद; “देवेंद्रजी योग्य न्याय करतील”, सत्तारांचा विश्वास