मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या अशा हजारो नागरिकांचे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. Good news! The dream of owning a house in Navi Mumbai will come true; Lottery for 5,000 CIDCO houses in 2022
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उदरनिर्वाहच्या निमित्ताने लाखो नागरिक मुंबईत येतात. काही जण हाताला मिळेल ते काम करतात आणि मुंबईत भाड्याचे घर घेऊन राहू लागतात. मुंबईत घरांची किंमत गगणाला भिडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे अशक्यच असल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या अशा हजारो नागरिकांचे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.
नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
कोरोना महासाथीमुळे म्हाडा, सिडकोकडून घरांसाठी सोडत काढण्यात आली नव्हती.कोरोना महासाथीनंतर ही लॉटरी निघणार असल्यामुळे घर खरेदीच्या प्रतिक्षेत असलेल्यांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
Good news! The dream of owning a house in Navi Mumbai will come true; Lottery for 5,000 CIDCO houses in 2022
महत्त्वाच्या बातम्या
- एमपीएससीचा संतापजनक कारभार, आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचे नाव मुलाखतींच्या यादीत
- कर्नाटकातील राजकीय घर, चार सख्खे भाऊ आमदार मात्र वेगवेगळ्या पक्षात
- केंद्राची भेट, देशभरातील शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र
- SANJAY RAUT : आप आए,बहार आई….संजय राऊतांचा किस्सा खुर्ची का नंतर राहुल गांधींसाठी खास गाणं ; व्हिडिओ व्हायरल …