• Download App
    महिलांसाठी खुशखबर! पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा ; 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार ; लोकल फॉर व्होकल...। Good news for women! Prime Minister Modi's big announcement on e-commerce; More than 8 crore women will get government assistance; Local for Vocal ...

    महिलांसाठी खुशखबर! पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा ; 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार ; लोकल फॉर व्होकल…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, सरकारकडून बचत गटांनी (SHG) बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली जाईल. रविवारी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, “खेडेगावांमधील 8 कोटीहून अधिक महिला या बचत गटांशी संबंधित आहेत, ज्या एकापेक्षा जास्त उत्पादने बनवतात, सरकारकडून त्यांना आधार दिला जाईल. यासाठी, आता सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल जेणेकरून ते त्यांच्या उत्पादनांसाठी देश-विदेशात मोठी बाजारपेठ उभारू शकतील. Good news for women! Prime Minister Modi’s big announcement on e-commerce; More than 8 crore women will get government assistance; Local for Vocal …

    पंतप्रधान (PM Narendra Modi) पुढे म्हणाले की, ‘व्होकल फॉर लोकल’ या घोषवाक्याने देश पुढे जात आहे. ते म्हणाले की, “भारताने ‘लोकल फॉर व्होकल’ उपक्रम सुरू केला आहे आणि स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याची जबाबदारी आपली आहे. प्लास्टिकमुक्त भारताचे आपले स्वप्न तेव्हाच साकार होऊ शकते जेव्हा आपण सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवू.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले की, देश आजपासून स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि येथून स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंतचा प्रवास हा ‘भारताच्या निर्मितीचा सुवर्णकाळ’ आहे. ते म्हणाले की, हे लक्ष्य “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” ने साध्य करावे लागेल.

    बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोनचिरैया’ ब्रँड सुरू

    केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने शहरी स्वयंसहाय्यता गटांच्या (एसएचजी) किंवा बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सोनचिरैया’ हा एकल ब्रँड सुरू केला आहे. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनानुसार, महिलांना “आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना सन्मानपूर्व जीवन जगण्यास मदत करणे” हे सरकारचे प्राधान्य आहे.

    गावांची प्रगती होतेय

    ग्रामीण भागातील विकासाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आपण आपली गावे झपाट्याने बदलताना पाहतोय. गेल्या काही वर्षांत रस्ते, वीज यांसारख्या सुविधा गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. आज ऑप्टिकल फायबर नेटवर्क गावांना डेटा पॉवर पुरवत आहेत.

    Good news for women! Prime Minister Modi’s big announcement on e-commerce; More than 8 crore women will get government assistance; Local for Vocal …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!