केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 31 टक्के झाला आहे. हा नवीन डीए 1 जुलै 2021 पासून गृहीत धरला जाणार आहे.Good news for state government employees: 3% increase in dearness allowance from the state along with the center, benefits 17 lakh employees
वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 31 टक्के झाला आहे. हा नवीन डीए 1 जुलै 2021 पासून गृहीत धरला जाणार आहे.
केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही निर्णय
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या काही तासांनंतरच महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.केंद्रापाठोपाठ
17 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या घोषणेपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे, तर महाराष्ट्र सरकारच्या घोषणेनंतर राज्य कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
जुलै 2021 पासूनचा वाढीव डीए मार्च महिन्याच्या पगारात एकाच वेळी मिळणार
राज्य प्रशासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या निर्णयानुसार 1 जुलै 2021 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीएमध्ये 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढलेली रक्कम मार्च 2022 च्या पगारात जमा होईल. महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने आज दोन महागाई भत्त्यांशी संबंधित शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी देण्यात आली असून, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन रचनेनुसार, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 28 टक्के होता, तो वाढवून 31 टक्के करण्यात आला आहे.
कर्मचारी संघटनांकडून निर्णयाचे स्वागत
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याच्या घोषणेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराशी संबंधित आनंदाची बातमी कधी येते याची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र सरकारने वेळ न दवडता महागाई भत्त्यात वाढ करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही खुश केले आहे. या निर्णयावर कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे.