• Download App
    रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : 4 जुलैपासून नांदेड- पुणे एक्स्प्रेस रोज धावणार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंची घोषणा|Good news for railway passengers Nanded-Pune Express will run daily from July 4, Union Minister of State for Railways Raosaheb Patil Danve announced

    रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : 4 जुलैपासून नांदेड- पुणे एक्स्प्रेस रोज धावणार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवेंची घोषणा

    प्रतिनिधी

    औरंगाबाद : आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड ते पुणे एक्स्प्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.Good news for railway passengers Nanded-Pune Express will run daily from July 4, Union Minister of State for Railways Raosaheb Patil Danve announced

    मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १२७३०/१२७२९ ची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. दिनांक 4 जुलै, 2022 पासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरू होणार आहे.पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे स्थानक बदलून ते पुणे करण्यात आले आहे, यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर झाले आहे.



    मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या सोयीच्या वेळेनुसार हि रेल्वे गाडी चालवली जात आहे, जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील. गाडी क्रमांक 12730 नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी 03.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 12729 पुणे – नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री 09.35 वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी 10.00 वाजता पोहोचेल. असे रेल्वे राज्यमंत्री यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते असे म्हणालेत की ही ट्रेन मराठवाड्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

    आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक LHB कोच (डब्बे) जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देईल. प्रवाशांना निर्धोक आणि सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत आणि प्रवेशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील.

    Good news for railway passengers Nanded-Pune Express will run daily from July 4, Union Minister of State for Railways Raosaheb Patil Danve announced

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!