Covishield vaccine price : देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना केंद्र सरकारने नुकतेच 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना 1 मेपासून लसीकरणास परवानगी दिली आहे. आता कोरोनावरील लस कोव्हिशील्डची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या लसीची किंमत निश्चित केली आहे. राज्य सरकारांना 400 रुपयांना लसीचा एक डोस मिळेल. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांना यासाठी प्रति डोस 600 रुपये द्यावे लागतील. Good news: Covishield vaccine price is priced at Rs 600 for private hospitals and Rs 400 for state governments
विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना केंद्र सरकारने नुकतेच 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना 1 मेपासून लसीकरणास परवानगी दिली आहे. आता कोरोनावरील लस कोव्हिशील्डची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या लसीची किंमत निश्चित केली आहे. राज्य सरकारांना 400 रुपयांना लसीचा एक डोस मिळेल. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांना यासाठी प्रति डोस 600 रुपये द्यावे लागतील.
कोव्हिशील्ड लस तयार करणार्या भारतीय सीरम संस्थेने बुधवारी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी आपले लसीचे दर जाहीर केले. खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रति डोस, तर राज्य सरकारांना 400 रुपये प्रति डोस दराने ही लस उपलब्ध होणार आहे.
भारत सरकारने नुकतीच लसीकरणाच्या नव्या टप्प्याची घोषणा केली आहे. या टप्प्यात राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये लस उत्पादकांकडून थेट लस खरेदी करण्यास सक्षम असतील. आतापर्यंत केवळ केंद्र सरकार ही लस विकत घेऊन वेगवेगळ्या राज्यांत वितरत करत होते.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारला अजूनही 50 टक्के लस मिळेल, तर उर्वरित 50 टक्के राज्य सरकार उत्पादकांकडून ही लस थेट मिळवू शकतील. तसेच खासगी क्षेत्रांनादेखील लस खरेदीची परवानगी असेल.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नवीन यादीनुसार या लसीची किंमत –
राज्य सरकारांना प्रति डोस 400 रुपये
खासगी रुग्णालयात प्रति डोस 600 रुपये
सीरम संस्थेचा असा दावा आहे की, त्यांची लस परदेशी लसीपेक्षा खूपच स्वस्त आहे. एसआयआयच्या मते,
अमेरिकन लस – 1500 रुपये प्रति डोस
रशियन लस – 750 रुपये प्रति डोस
चिनी लस – 750 रुपये प्रति डोस
सीरम संस्थेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या दोन महिन्यांत ते केंद्र आणि राज्य सरकारांना मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देणार आहेत. लस तयार झाल्यानंतर 4 ते 5 महिन्यांनंतर ती किरकोळ बाजारात दाखल होईल.
आतापर्यंत भारत सरकारला सीरम इन्स्टिट्यूटकडून 200 रुपये प्रति डोससाठी दिले जात होती. केंद्र सरकार सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देत होते, तर खासगी केंद्रांवर 250 रुपये दराने किंमत निश्चित करण्यात आली होती.
1 मेपासून भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन लसीकरण टप्प्यानुसार आता 18 वर्षांवरील सर्व लोकांना ही लस मिळू शकेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे, ते पुढेही सुरूच राहील. म्हणजेच सरकारी केंद्रांमध्ये ही लस विनामूल्य उपलब्ध असेल.
Good news: Covishield vaccine price Rs 600 for private hospitals and Rs 400 for state governments
महत्त्वाच्या बातम्या
- Make In India : 4825 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर सॅमसंगच्या नोएडातील कारखान्यात मोबाइल डिस्प्लेच्या उत्पादनास सुरुवात
- ‘साहेब! कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलंय..’ पुण्यात पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार
- मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत मिळेल कोरोनाची लस
- Remdesivir Import Duty Free : सरकारने रेमडेसिव्हिरची इम्पोर्ट ड्यूटी हटवली, आणखी स्वस्त होणार इंजेक्शन, पुरवठाही वाढणार
- ‘शहरी माओवाद्यांकडून हिंसाचाराचा धोका..’ नक्षलवाद्यांविरुद्ध लढणारे निवृत्त IPS रवींद्र कदम यांनी दिला इशारा