नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.Golden Boy Neeraj Chopra to be honored with Distinguished Service Medal on Republic Day
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ३८४ जणांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते हे शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे.ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे.
त्याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकच्या अंतिम स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत ट्रॅक अँड फील्डमध्ये देशासाठी पहिले पदक जिंकले होते.
नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.
दरम्यान पुरस्कारांमध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पदके, ४ उत्तम युद्ध सेवा पदके, ५३ अति विशिष्ट सेवा पदके, १३ युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे.भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत.
Golden Boy Neeraj Chopra to be honored with Distinguished Service Medal on Republic Day
महत्त्वाच्या बातम्या
- UP Assembly Election : स्टार प्रचारकाकडूनच काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांचा पक्षाचा राजीनामा; भाजपमध्ये करणार प्रवेश
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- अखेर जाहीर झाला राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक ; यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती