• Download App
    Godavari Puja हजारो नाशिककरांच्या उत्साहात रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि महाआरतीचा दिव्य सोहळा राजमाता अहिल्यादेवींच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण!!

    हजारो नाशिककरांच्या उत्साहात रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि महाआरतीचा दिव्य सोहळा राजमाता अहिल्यादेवींच्या तेजस्वी स्मृतीस अर्पण!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशत जयंतीनिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गोदावरी पूजन आणि महाआरतीचा ऐतिहासिक सोहळा भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हता, तर तो राजमातांच्या तेजस्वी कार्यास भावांजली समर्पित करणारा ठरला.

    सायंकाळी ६:३० वाजता रामतीर्थ घाटावर, होळकर घराण्याचे वंशज राजमान्य श्रीमंत युवराज यशवंतराजे होळकर (तृतीय) यांच्या शुभहस्ते गोदामातेचे पूजन करण्यात आले. या क्षणी रामतीर्थाच्या घाटावर एक भक्तिमय आणि ऐतिहासिक साक्षात्कार अनुभवास मिळाला. त्यांच्या समवेत श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे मामा श्री. अमरजीतसिंह बारगळ मामा यांचीही उपस्थिती लाभली, ज्यामुळे परंपरेची सात्त्विक छटा अधिक गडद झाली.

    या प्रसंगी संतसेवा संघाचे अध्यक्ष भागवतकार पूज्य संजय गुरुजी यांच्या हस्ते मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. पगडी, शाल, श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. युवराज यशवंतराजे यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.



    यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधत वीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावांजली अर्पण करण्यात आली. सर्व युवक सेवकांनी राष्ट्रासाठी क्षणोक्षणी कार्य करण्याचा दृढ संकल्प केला.

    या दिव्य सोहळ्याला अनेक मान्यवर आणि समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष सौ. अशिमा केला, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फड, प्रफुल्ल संचेती, चैतन्य गायधनी, स्वागत समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, रामेश्वर मालाणी, नरेंद्र कुलकर्णी, दिलीपदादा दीक्षित तसेच उद्योजक धनंजय बेळे, शिवाजीराव बोंदार्डे,वैभव क्षेमकल्याणी, रंजितसिंग आनंद, अमोल गायकवाड विभाग प्रमुख अनुलोम, दत्ता मिसाळ, शहरातून धनगर समाजातील अनेक जेष्ठ मान्यवर यांची सक्रिय उपस्थिती लाभली.

    कार्यक्रमात गायधनी , अक्षय शेरताटे, शुभम पाटील, हितेश चंदवाणी, तुषार गुरुम वेदिका अंभोरे ,कु. आकांक्षा नांद्रे, कु. वरदा जोशी, सायली पाठक हे युवा कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

    या सोहळ्याने केवळ घाट उजळला नाही, तर सगळ्या नाशिककरांच्या मनामनांत श्रद्धा आणि अभिमानाचे दीप उजळले. रामतीर्थ घाटावरील हा क्षण, राजमाता अहिल्यादेवींच्या कार्यास समर्पित अशी एक अनोखी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अभिव्यक्ती ठरला.

    Godavari Puja and maha Aarti dedicated to rajmata ahilyadevi Holkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी 10 हजारांची आर्थिक मदत; अजित पवार यांची मोठी घोषणा

    CM Fadnavis : ‘लाडकी बहीण’साठी निधी पळवल्याचा आरोप खोटा; CM फडणवीसांचा विरोधकांना टोला- अर्थसंकल्प कळत नसेल तर माझ्याकडे या

    Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती; मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका