• Download App
    Godavari Maha Aarti रामकुंडावर राष्ट्रभावनेची आरती; उद्या 1 ऑगस्टला गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात सिख परंपरेचे संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी

    रामकुंडावर राष्ट्रभावनेची आरती; उद्या 1 ऑगस्टला गोदावरी सेवा समितीच्या आयोजनात सिख परंपरेचे संत, राष्ट्रीय मान्यवर सहभागी

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : श्रावणमासाच्या पावन संध्याकाळी गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने उद्या १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार, सायंकाळी ६ वाजता रामकुंड गोदावरी तीरावर गोदावरी महाआरती संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम धार्मिक विधी बरोबरच सामाजिक समरसता, श्रद्धा आणि राष्ट्रभावनेचा सांस्कृतिक संगम देखील ठरणार आहे. Godavari Maha Aarti

    या महाआरती मध्ये सिख पंथातील मान्यवर संत आणि धर्मप्रेमी नागरिकांचा सन्माननीय सहभाग लाभणार असून, महाआरतीला उपस्थित राहणारे प्रमुख अतिथी पुढीलप्रमाणे आहेत.


    चुकार मंत्र्यांना झापले की नाही??, फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही!!


    •  पूजनीय जत्थेदार बाबा रणजीतसिंगजी गुप्तसर, गुरुद्वारा, मनमाड
    •  सरदार मलकितसिंगजी बाल, एक्झिक्युटिव्ह चेअरमन, महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमी (अल्पसंख्याक विकास विभाग)
    •  सरदार जसपालसिंगजी सिद्धू, प्रेसिडेंट, सिक्ख कोऑर्डिनेशन कमिटी, महाराष्ट्र
    • सरदार राजकमलसिंगजी गाडीवाले, निष्काम सेवा प्रतिष्ठान, नांदेड
    • डॉ. विजय सदबीरसिंगजी, गुरुद्वारा बोर्ड, श्री हुजूर सचखंड अबचल नगर साहेब, नांदेड

    कार्यक्रमाअंतर्गत सिख परंपरेतील दसगुरूंचं सामूहिक पूजन, भावगीतांमधून राष्ट्रभक्तीची ध्वजा उंचावणारी कीर्तनमयी संध्या आणि नंतर विधिवत महाआरती होईल.

    गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. जयंत गायधनी, सचिव श्री. मुकुंद खोचे आणि विश्वस्त रणजीतसिंग आनंद यांनी सर्व नाशिककरांना या कार्यक्रमात सहपरिवार सहभागी होण्याचे सादर आवाहन केले आहे.

    Godavari MAHA Aarti of national Pride tomorrow on 1st August, Sikh saints will be present at Ram kund

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pankaja Munde : मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये; OBC उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका

    Manoj Jarange : छगन भुजबळ सरकारसाठी डोकेदुखी, ते नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे, मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर निशाणा

    Chhagan Bhujbal : OBC उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक; मराठा समाजाला जास्त निधी दिल्याचा आरोप; कुणबी नोंदींच्या GR वरही घेतला आक्षेप