विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज सायंकाळी रामकुंड येथे संपन्न होणाऱ्या गोदावरी महाआरतीस आज विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले, जेव्हा देशभरातील विविध सैनिकी प्रशिक्षण केंद्रांतून आलेल्या सुमारे 200 हून अधिक युवा सैनिकांनी आरतीत सहभाग घेतला.
या भव्य महाआरतीत सहभागी होताना जवानांनी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” चा जयघोष करत संपूर्ण घाट परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून टाकला. त्यांनी गोदावरी मातेचे वंदन करत भारतमातेच्या रक्षणासाठी बळ प्राप्त होवो, अशी सामूहिक प्रार्थना केली. उपस्थित भाविकांच्या मनात या दृश्याने अभिमान, आदर आणि भावनिक ऊर्जेचा अनुभव निर्माण केला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून ही महाआरती सातत्याने व भक्तिभावाने आयोजित करत असून, ही आरती नाशिककरांसह देशभरातील व विदेशातील श्रद्धाळू भाविकांसाठीही एक आकर्षण ठरली आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे देशविदेशातील पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे. या विशेष दिवशी जवानांची उपस्थिती ही केवळ धार्मिक सहभाग नव्हे, तर गोदावरी तीरावर भारतीय संस्कृती, आध्यात्म आणि देशसेवेचा संगम असल्याची जाणीव सर्वांनाच झाली.
Godavari maha aarti by yua sainiks at ramtirth Godavari seva samiti
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?