• Download App
    Godavari Aarti भक्तीभाव आणि ऐक्य भावनेने गोदावरी घाट उजळला; श्रीकर परदेशी आणि दादा वेदक यांच्या हस्ते गोदावरी आरती; एकादशीनिमित्त गीता पठण

    भक्तीभाव आणि ऐक्य भावनेने गोदावरी घाट उजळला; श्रीकर परदेशी आणि दादा वेदक यांच्या हस्ते गोदावरी आरती; एकादशीनिमित्त गीता पठण

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : पावन गंगा-गोदावरीच्या तीरावर दररोज भक्तिभावाने संपन्न होणारी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची महाआरती आज विशेष उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक श्री. श्रीकर परदेशी हे सपत्नीक या आरतीसाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गोदापूजन आणि महाआरती विधी मंत्रोच्चारात पार पडले.

    विशेष म्हणजे, त्यांच्या समवेत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सत्संग प्रमुख श्री. दादा वेदक हेही या प्रसंगी घाटावर उपस्थित होते. यासोबतच अमेरिका, नवी दिल्ली, पाटणा, मुंबई आदी देशविदेशातील विविध महानगरांमधून आलेले अनेक श्रद्धाळू, आध्यात्मिक अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या दिवशीचा घाट भक्तिभाव, आध्यात्मिकतेने आणि एकात्मतेने उजळून निघाला.



    या पावन एकादशीच्या निमित्ताने इस्कॉन संस्थेचे ब्रह्मचारी आणि समितीचे विश्वस्त नृसिंह कृपादास यांनी भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचे प्रभावी पठण केले. त्यांनी त्या श्लोकांचे अर्थ भाविकांना समजावून सांगितले. जीवनातील धर्म, कर्तव्य आणि भक्तीभाव यांची सखोल मांडणी केली. उपस्थित भाविक या सत्त्वदायी वाणीने अंतर्मुख झाले.

    रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. जयंत गायधनी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, तर सचिव श्री. मुकुंद खोचे यांनी समितीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. समितीचे विश्वस्त आणि प्रसिद्ध वास्तुविशारद श्री. शैलेश देवी, श्री. शिवाजीराव बोंदार्डे आणि श्री. वैभव क्षेमकल्याणी यांनीही मान्यवरांचे सन्मानपूर्वक स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली.

    या सोहळ्यामुळे गंगा-गोदावरी संगमाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व नव्या उंचीवर पोहोचले असून, घाटविकास आणि अध्यात्मसेवा या दोन्ही क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

    Godavari Aarti performed by Shrikar Pardeshi and Dada Vedak

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!