विशेष प्रतिनिधी
नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने इस्कॉनचे वरिष्ठ संत श्रीपाद राधानाथ स्वामी महाराज यांना आरतीसाठी आमंत्रित केले होते. परंतु, मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात होऊ शकला नव्हता. त्या दिवशी राधानाथ स्वामी महाराजांनी रामतीर्थावर गोदावरी पूजन आणि ध्यान केले. पण आज विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर हजारो नाशिककर भाविकांच्या उपस्थितीत राधानाथ स्वामी महाराजांनी रामतीर्थावर येऊन गंगा गोदावरी आरती करून हा अनुपम्य सोहळा अनुभवला. Godavari
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरीत महाआरती आणि संत दर्शन सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. विशेष स्टेज, रांगोळी, भव्य साऊंड सिस्टम आणि लाईट यांचे मोठे आयोजन करण्यात आले होते. परंतु, मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्व स्टेज आणि सिस्टम काढावी लागली होती.
पण त्याचवेळी राधानाथ स्वामीजींनी सांगितलं होतं, की मला गोदावरी महाआरतीचा अमृता नुभव घ्यायचा आहे म्हणून मी परत रामतीर्थावर येईन. त्यानुसार ते आणि शिक्षाष्टम स्वामी महाराज आज दसऱ्याच्या मुहूर्तावर गोदावरी तीरी रामतीर्थावर आले. तिथे त्यांनी गंगा गोदावरीची महाआरती केली. यावेळी हजारो नाशिककर भाविक हा भव्य सोहळा आपल्या नयनांमध्ये साठवून घेण्यासाठी गोदातीरी उपस्थित होते.
Godavari aarti by radhanath swami maharaj
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Pakistan cricket team : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम!
- Sayaji shinde : स्टार प्रचारक सयाजी शिंदेंची अजितदादांकडे एन्ट्री; राष्ट्रवादीतली थांबविणार का गळती??
- Mahadev : महादेव बेटिंग ॲपचा मास्टरमाईंडला दुबईत अटक