• Download App
    Godavari Aarti रामकुंडावर गोदावरी आरती आणि समरसता संध्या संपन्न; शीख समाजाच्या घोषणांनी दुमदुमला रामघाट!!

    रामकुंडावर गोदावरी आरती आणि समरसता संध्या संपन्न; शीख समाजाच्या घोषणांनी दुमदुमला रामघाट!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : पावन गोदावरी तीर्थावर रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने आयोजित गोदावरी आरती आणि समरसता संध्या हा विशेष सोहळा उत्सवी आणि भावपूर्ण वातावरणात अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. Godavari Aarti

    मनमाड येथील गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब येथून आलेले पूज्य जत्थेदार बाबा रणजीतसिंगजी यांच्या पावन उपस्थितीने संपूर्ण रामघाट परिसर धन्य झाला. त्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात शीख समाजाच्या पारंपरिक “जो बोले सो निहाल” घोषणांनी गगन दुमदुमला.

    दशगुरु परंपरेचे प्रतीक श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांच्या समोर अत्यंत भावपूर्ण आरती संपन्न झाली. धार्मिक सौहार्द, परंपरागत श्रद्धा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संगम म्हणून हा सोहळा अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला.

    • प्रमुख पाहुण्यांची गौरवमयी उपस्थिती

    या समरसता संधेला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अनेक मान्यवरांचा सन्मानपूर्वक सहभाग लाभला. त्यामध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये हे मान्यवर विशेष उपस्थित होते :

    रामेश्वर नाईक – मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक

    प्रा. सुकांत सेनापती – कुलगुरु, सोमनाथ विद्यापीठ

    प्रा. बिहारीलाल शर्मा – कुलगुरु, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, काशी

    डॉ. वाचस्पती मिश्र – अध्यक्ष, उत्तर प्रदेश संस्कृत संस्थान

    श्री रणजीतसिंग आनंद आणि गोपाल लाल यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

    डॉ. अंजली वेखंडे – महिला विश्वस्त

    सौ. अशीमा केला कोषाध्यक्ष

    श्री. गोपाललालजी – सन्माननीय समाजसेवक

    डॉ. अभय वालिया – सुप्रसिद्ध हृदयरोग चिकित्सक

    शीख समाजाच्या मान्यवरांचे विशेष प्रतिनिधित्व


    चुकार मंत्र्यांना झापले की नाही??, फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळात जे बोललो, ते बाहेर सांगणार नाही!!


     

    • सदर समरसता आरती कार्यक्रमासाठी शीख समाजाच्या विविध मान्यवरांची प्रभावी उपस्थिती लाभली :

    बलजीतसिंग सिब्बल

    इंदरसिंग घटोडे

    मलकितसिंग बल

    चरणदीपसिंग

    जसपालसिंग सिद्धू

    राजकमलसिंग

    हरप्रीत छाबडा

    सम्मी बग्गा

    रणधीरसिंग रेणू

    या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने संपूर्ण समरसता संध्या अधिक तेजस्वी आणि ऐतिहासिक ठरली. गायधनी आणि हितेश चंदवाणी यांनी शीख समाजाच्या युवा प्रतिनिधींचे विशेष आत्मीयतेने स्वागत केले.

    सौ. अशीमा केला, कविता देवी, डॉ. अंजली वेखंडे यांनी शीख भगिनींचा सन्मानपूर्वक सत्कार केला. श्री. नृसिंह कृपादास, श्री. वैभव क्षेमकल्याणी, श्री. धनंजय बेळे या तीर्थ पुरोहितांचा समरसतेत विशेष सहभाग होता.

    आरती आणि प्रसाद

    हर हर महादेव आणि जो बोले सो निहाल या घोषणांनी रामघाट दुमदुमला. कु. स्वरा क्षेमकल्याणी आणि श्री. लोकेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक गोदावरी आरती भक्तिभावाने संपन्न झाली. आरतीनंतर गुरुद्वारा श्री गुप्तसर साहिब यांच्यातर्फे हजारो भाविकांना पवित्र लंगर प्रसाद देण्यात आला.

    या ऐतिहासिक समरसता संध्या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. मुकुंद खोचे आणि श्री. रणजीतसिंग आनंद यांनी अत्यंत प्रभावी शैलीत केले.

    हजारो शीख बांधव, संत, तीर्थपुजारी आणि सनातन परंपरेचे श्रद्धावान उपासक या दिवशी एकत्र आले होते. ही आरती केवळ धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक समरसतेचा, श्रद्धेचा आणि राष्ट्रीय ऐक्याचा दीपस्तंभ ठरली. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, सेविकावृंद यांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रम यशस्वी केला. समितीच्या वतीने विश्वस्त आर्किटेक शैलेश देवी प्रफुल्ल संचेती यांनी मान्यवरांचे स्वागत आणि अभिवादन केले. अध्यक्ष जयंत गायधनी यांनी सर्वांचे आभार मानले.

    Godavari Aarti and Samarasata Sandhya celebrated at Ramkund

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, 15 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    Suresh Dhas advice to the Hake : आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात; आक्रस्ताळेपणा बंद करा ! सुरेश धस यांचा हाकेंना सल्ला