• Download App
    Gautam Adani महापालिका निवडणुकांच्या ऐन मध्यावर बारामतीत अदानींचा कार्यक्रम; सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!

    महापालिका निवडणुकांच्या ऐन मध्यावर बारामतीत अदानींचा कार्यक्रम; सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या असताना बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम; भाजपच्या सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!, हेच राजकीय वास्तव समोर आलेय. Gautam Adani

    महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या सगळीकडे युत्या, आघाड्या किंवा स्वबळ यांच्या चर्चा सुरू झाल्यात. पवार काका – पुतण्याच्या दोन्ही राष्ट्रवादी राजकीय अपरिहार्यतेपोटी एकत्र येऊन निवडणुका लढवायला तयार झाल्यात. जागावाटपाच्या चर्चा आणि खेचाखेची सुरू झाल्यात.

    या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी 28 डिसेंबर 2025 रोजी बारामतीत गौतम अदानी यांचा कार्यक्रम घेतलाय. त्यांनी दिलेल्या 25 कोटींच्या देणगीतून उभारलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या नूतन वास्तूचे उद्घाटन गौतम अदानींच्या हस्ते करण्याचा निर्णय पवारांनी घेतला. त्यानुसार हा कार्यक्रम बारामतीच्या गदिमा सभागृहात होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे युगेंद्र पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.



    – सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची हुलकावणी

    ऐन महापालिका निवडणुकांच्या मध्यावर गौतम अदानींचा कार्यक्रम घेऊन शरद पवारांनी भाजपच्या सत्तेची जवळीक साधलीय. पण यातून त्यांना राज्यसभेची सीट पुन्हा मिळवण्याच्या धडपडीखेरीज दुसरे काही हाती लागेल का??, याविषयी दाट शंका आहे. शरद पवारांची राज्यसभेची मुदत एप्रिल – मे 2026 मध्ये संपत आहे. पवारांना पुन्हा राज्यसभेवर जायचे असेल, तर भाजपच्या सत्तेशी जवळीक साधल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सुप्रिया सुळे यांचे मंत्रीपद वगैरे ठीक आहे. तशीही त्यांच्या मंत्रीपदाची चर्चा 2014 पासून सुरूच आहे. पण त्यानंतर 11 वर्षे उलटून गेली तरी सुप्रिया सुळेंना मंत्रीपद काही मिळालेले नाही. शरद पवारांच्या तळ्यात – मळ्यातल्या राजकारणामुळे सुप्रिया सुळेंना मंत्रीपदाने कायमच हुलकावणी दिलीय.

    – नव्या रचनेत सुप्रिया सुळे बसतच नाहीत

    भाजपच्या नव्या रचनेत जेव्हा स्वतःच्याच पक्षात नवी पिढी पुढे आणली जात आहे, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होताना याच नव्या पिढीचा विचार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराचे निकष देखील नव्याने ठरविले गेले आहेत. भाजप अशावेळी स्वतःच्या नव्या नेतृत्वाला विकसित करण्याला प्राधान्य देईल, की सुप्रिया सुळे यांच्यासारख्या जुन्या नेत्याला खरंच मंत्रिपद देईल??, याविषयी खऱ्या अर्थाने दाट शंका आहे. कारण सुप्रिया सुळे भाजपच्या नव्या राजकीय व्यूहरचनेत फिट बसतच नाहीत. त्यामुळे पवारांची भाजपच्या सत्तेशी जवळीक साधण्याची धडपड ही फक्त त्यांच्या राज्यसभा सीट पुरती मर्यादित राहण्याचीही शक्यता आहे.

    Gautam Adani’s program in Baramati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने नाराज असलेल्या जगतापांची काँग्रेससोबत हातमिळवणी !

    मुंबईत स्वबळाचा काँग्रेसलाच मोठा तोटा; तर ठाकरे बंधूंच्या यशात खोडा!!

    Devendra Fadnavis : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू; ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात