• Download App
    आता अंबानी आहे का नाही तर अदानी आहे का म्हणायचं, मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत|Gautam Adani became the richest man in the country after Mukesh Ambani.

    आता अंबानी आहे का नाही तर अदानी आहे का म्हणायचं, मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले देशातील सर्वात श्रीमंत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एखादा आपल्या पैैशाचा गर्व करू लागला तर लोक मोठा अंबानी लागून गेला आहे असे म्हणतात. पण आता अंबानी नव्हे तर अदानी आहेस का? असे म्हणावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका रिलायन्स कंपनीला बसला असून रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे.Gautam Adani became the richest man in the country after Mukesh Ambani.

    यामुळे मुकेश अंबानींच्या कमाईत मोठी घसरण झाली. त्यामुळे अदानी उद्योगसमुहाचे गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत अंबानींना त्यांना मागे टाकले आहे. अशा प्रकारे अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.



    फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ डेटानुसार, गौतम अदानी यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्स (रु. 6.72 लाख कोटी) आहे, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 89.8 अब्ज डॉलर्स (6.71 लाख कोटी रुपये) आहे. या आकडेवारीनुसार कमाईच्या बाबतीत अदानी जगात अकराव्या क्रमांकावर आहेत.

    बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स दोन दिवसांत 155 रुपयांनी घसरले. रिलायन्सचे शेअर्स 2.29% घसरून 2323.05 रुपयांवर ट्रेंड करत आहेत. रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 200 रुपयांची घसरण झाली आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसांत 7 अब्ज डॉलर (52,000 कोटी रुपये) ने घट झाली आहे.

    फोर्ब्सच्या रिअल-टाइम डेटानुसार, 31 डिसेंबर रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 78 अब्ज डॉलर्स (रु. 5.82 लाख कोटी) होती. 18 जानेवारी 2022 रोजी वाढून 93 अब्ज डॉलर्स (रु. 6.95 लाख कोटी) झाली होती. यावेळी म्हणजे 25 जानेवारी रोजी अदानीची एकूण संपत्ती $90 अब्ज (6.72 लाख कोटी रुपये) आहे. त्यानुसार, नवीन वर्षात गौतम अदानी दररोज 6,000 कोटींहून अधिक कमाई करत आहेत.

    अदानी समूहाच्या 6 कंपन्या भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या वर्षी जानेवारीमध्येच या सर्व कंपन्यांना ५% ते ४५% पर्यंत परतावा मिळाला आहे. विशेषत: समूहाच्या ऊर्जा कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. यामध्ये देखील अदानी ग्रीन एनजीर्ने 45% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. याशिवाय अदानी ट्रान्समिशन आणि अदानी पॉवरमधील गुंतवणूकदारांना कमी वेळेत जास्त परतावा मिळाला आहे.

    गेल्या 5 दिवसांत आशियाई बाजारातील सर्वात मोठी घसरण भारतात दिसून आली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्ससमध्ये बजाज फिनसर्व्हला 15% सर्वात जास्त नुकसान झाले आहे. तर एका दिवसात मुकेश अंबानींच्या संपत्तीत 31 हजार कोटींची घट झाली आहे.

    सोमवारी, भारतीय बाजार सुमारे 2.6% घसरले. 26 नोव्हेंबरनंतर एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती. शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्याची सुरुवात 18 जानेवारीला झाली.

    यादरम्यान आशियाई बाजारांमध्ये सर्वाधिक घसरण भारताच्या बाजारात झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी जवळपास 7% घसरला, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (इरए) चा सेन्सेक्स 6.7% घसरला. सोमवारी एकाच दिवसात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 31 हजार कोटींची घट झाली आहे. त्यांची संपत्ती आता 6.75 लाख कोटी रुपये आहे.

    Gautam Adani became the richest man in the country after Mukesh Ambani.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस