• Download App
    गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी राज ठाकरेच्या सभेचा देखावा! कल्याण मधील एका तरुणांना साकारला हा देखावा! Ganpati decoration with Raj Thakre theme!

    गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी राज ठाकरेच्या सभेचा देखावा! कल्याण मधील एका तरुणांना साकारला हा देखावा!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आपल्या घरातील गणपती बाप्पाची आरास ही वेगळी हटके असावी, शक्यतो ती इको फ्रेंडली असावी, आणि सगळ्यांपेक्षा वेगळी असावी यासाठी प्रत्येक गणेशभक्त आटोकाट प्रयत्न करत असतो. Ganpati decoration with Raj Thakre theme!

    गणपती बाप्पाच्या आगमनाला एक ते दीड महिना राहिले असताच घराघरात गणपतीची यंदा कशा पद्धतीने करायची यावर चर्चा झडते, त्यानंतर एक वेगळी कुठलीतरी थीम ठरवून तो निर्णय पक्का होतो त्यासाठी लागणारे सगळं डेकोरेशनच मटेरियल बाजारातून खरेदी होतं आणि अथक प्रयत्नानंतर घरातल्या प्रत्येक सदस्याच्या मदतीने गणपती बाप्पाचे ती सुरेख आरास साकारली जाते.

    कल्याण मधील एका तरुणानं मात्र आतापर्यंत कोणीही न साकारलेली अगदी जगावेगळी हटके अशी आरास गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी केली आहे. या तरुणाने चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचीच प्रतिकृती सादर केली आहे. याची आता समाज माध्यमातून चर्चा होऊ लागली आहे.

    राज ठाकरे हे तरुणांमध्ये लोकप्रिय नेते असून, सर्वसामान्य तरुणांमध्ये राज ठाकरे च्या भाषणाची त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मोठी क्रेझ आहे. त्यांच्या सभा ला होणारी गर्दी हा कायमच चर्चेसाठी विषय असतो. सध्याच्या राजकारणात सगळ्यांना आकर्षित करणारा नेता म्हणून राज ठाकरे कडे बघितला जात.

    मराठीचा मुद्दा असू दे किंवा हिंदू संणाचा विषय असू दे आपली कडवट आणि प्रखर भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत असतातच यामुळेच कल्याण मध्ये राहणारा अमोल गव्हाणे या तरुणाने आपल्या लाडक्या बाप्पासाठी राज ठाकरेंच्या सभेची प्रतिकृती आरास म्हणून सरकली आहे.तसेच भविष्यात महाराष्ट्रात मनसेची सत्ता यावी आणि मुख्यमंत्री पदी राज ठाकरे असावे असे साकडे तरुणांनी बाप्पाकडे घातले आहे…

    Ganpati decoration with Raj Thakre theme!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस