विशेष प्रतिनिधी
नाशिक : श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि श्रीराम मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट उपसले ते प. पू. गोविंददेव गिरीजी महाराज यांचे नाशिकमध्ये आज सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यांच्या हस्ते गोदा घाटावर गंगा-गोदा महाआरतीही झाली. त्यानंतर सुश्राव्य वाणीने त्यांनी रामकथा ऐकवली त्यावेळी उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. Ganga Godavari Mahaarti by Govinddev Giri Maharaj in Nashik
गोविंददेव गिरी यांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रभू राम नाशिकमध्ये आल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यावेळी जय श्रीराम घोषणेने आसमंत परिसर दणाणला होता. नाशिकच्या पवित्रभूमीत रामकथा सादर करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे सांगून रामकथा लोकांच्या मनामनात रुजली आहे. तिने लोकांना वेडे केले, असे गोविंददेवगिरी महाराज यांनी नमूद केले.
गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंददेव गिरी महाराज यांना
प्रदान करण्याचा कार्यक्रम आज शुक्रवारी (दि. 31) रोजी सायंकाळी गोदा घाटावरील भाजी पटांगणावर सायंकाळी 7:30 वाजता संपन्न होत असून त्याच्या पूर्वसंध्येला त्यांच्या हस्ते महाआरती आणि रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी रामतीर्थ गोदावारी समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी रामकथेची प्रस्तावना केली. गायधनी तसेच स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष धनंजय बेळे, सत्कार समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, मुकुंद खोचे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंददेव गिरी महाराजांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभव जोशी, नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला, वैभव क्षेमकल्याणी, विजय भातंबरेकर, शिवाजी बोंदार्डे, प्रेरणा बेळे, रणजित सिंग आनंद, विजय जोशी, रामेश्वर मलानी, उदयन दीक्षित, राजेंद्रनाना फड, गुणवंत मणियार आदी उपस्थित होते. प्रेरणा बेळे यांनी आभार मानले.
Ganga Godavari Mahaarti by Govinddev Giri Maharaj in Nashik
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना पुतीन यांचा इशारा; ज्या देशाच्या शस्त्रांनी हल्ला, ते गंभीर परिणाम भोगतील
- काशीमध्ये लोकांचा उत्साह प्रचंड; मोदींच्या दिग्विजयात मराठी माणूस भागीदार : देवेंद्र फडणवीस
- मी नार्को टेस्ट क्लियर केली तर अंजली दमानिया घरी बसतील का??; अजितदादांचे प्रतिआव्हान!!
- सांगलीत भीषण दुर्घटना! कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू