विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रासह देशात निवडणूक वर्षातला गणेशोत्सव दणक्यात सुरू झाला. कोट्यावधी हिंदू गणेश भक्तांनी भक्तिभावाने गणपतीची घराघरात प्रतिष्ठापना केली. मात्र राजकीय नेत्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेऊन गणरायाला आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी साकडे घातले. Ganeshotsav started today
पुण्यातले पाच मानाचे गणपती श्री कसबा गणपती श्री जोगेश्वरी गणपती श्री गुरुजी तालीम गणपती श्री तुळशीबाग गणपती श्री गणेशोत्सव गणपती यांची दणक्यात मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडपामध्ये प्रतिष्ठापना केली मुंबईमध्ये लालबागचा राजा चिंचपोकळीचा राजा दिमाखदारपणे मंडपात सुप्रतिष्ठित झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर गणेशोत्सवाचा दणक्यात प्रारंभ झाला.
नेत्यांनी मात्र सार्वजनिक गणेशोत्सवात राजकारण सोडले नाही त्यांनी गणरायाला सत्तेसाठी साकडे घातले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी गणपतीला महायुतीच्या नेत्यांना न भांडण्याची सद्बुद्धी दे असे साकडे घातले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येता येता थांबलेले नेते एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येऊ दे असा नवस गणपतीला बोलले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्र्यांनी आणि नेत्यांनी यांनी आपापल्या सरकारी निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Ganeshotsav started today
महत्वाच्या बातम्या
- Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
- Sitaram Yechury : सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक, दिल्लीतील ‘AIIMS’मध्ये व्हेंटिलेटरवर हलवले
- Mohan Bhagwat : समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचल – मणिपूरमधल्या स्थितीत सुधारणा; सरसंघचालकांचा विश्वास!
- Vladimir Putin : ‘भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थ होऊ शकतात…’, युक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चेवर पुतिन यांची मोठी घोषणा