• Download App
    गणेशोत्सव स्पेशल : गणपतीसाठी कोकणात आता धावणार २०६ विशेष रेल्वेगाड्या!!|Ganeshotsav Special: 206 special trains will now run in Konkan for Ganesha!!

    गणेशोत्सव स्पेशल : गणपतीसाठी कोकणात आता धावणार २०६ विशेष रेल्वेगाड्या!!

    प्रतिनिधी

    मुंबई : गणपती उत्सव २०२२ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान जादा गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच १९८ गणपती विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे यावर्षी एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या २०६ होणार आहे.Ganeshotsav Special: 206 special trains will now run in Konkan for Ganesha!!

    विशेष गाड्यांचे तपशील :

    01165 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी ००.४५ वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.

    तर 01166 विशेष १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर (४ सेवा) पर्यंत दर मंगळवारी मंगळुरु जंक्शन येथून २२.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.



    थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल, ठोकूर.

    संरचना : एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, दोन जनरेटर व्हॅन, एक पँट्री कार.

    आरक्षण : विशेष गाडी क्र. 01165 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १८.७.२०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

    या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेकडून दिला जात आहे.

    Ganeshotsav Special: 206 special trains will now run in Konkan for Ganesha!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!