विशेष प्रतिनिधी
पुणे : सलग दुस-या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. ट्रस्टच्या १२९ वर्षात सलग दुस-या वर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे उत्सवाची परंपरा खंडित होत आहे. Ganeshotsav of ‘Dagdusheth’ will be held in the main temple this year; For the second year in a row, the tradition of the festival is broken
बाप्पांच्या ऑ नलाईन दर्शन सुविधेवर व ऑ नलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असून ऑ गमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन भक्तांना घरबसल्या मंदिराच्या गाभा-यात बाप्पाची आरती करण्याचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून घेता येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ.रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. ऑ गमेंटेंड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाचा वापर हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्टय असणार आहे. जास्तीत जास्त भक्तांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, याकरीता या तंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या काळात ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते देखील मंदिरात जाणार नसल्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. दैनंदिन धार्मिक विधी केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. गणेशोत्सवात मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईसह मिष्टांनांचा भोग श्रीं समोर लावण्यात येणार आहे.
Ganeshotsav of ‘Dagdusheth’ will be held in the main temple this year; For the second year in a row, the tradition of the festival is broken
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांवर होणार कारवाई, पालकमंत्र्यांसमोरच घेतली जाणार हजेरी
- AARAMBH AURANGABAD : आरंभ ‘त्यांच्या’ भविष्याचा…!आरंभ ‘त्यांच्या’ विश्वाचा…आरंभ ‘त्यांच्या’ संगोपनाचा…आरंभ ‘अंबिकेच्या’ जिद्दीचा…चला भेटूया विशेष मुलांच्या मातेला!
- उत्तर प्रदेशात अब की बार 400 पार; अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा नारा