प्रतिनिधी
मुंबई : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले.Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s decision
हे निर्णय असे :
- महाराष्ट्रातील राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. 5000 कोटींचा प्रस्ताव.
- गौरी गणपती, दिवाळीसाठी 100 रुपयात #आनंदाचाशिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा. गेल्या वर्षी फक्त दिवाळीत हा आनंदाचा शिधा सरकारने दिला होता. यावर्षी गणेशोत्सवात देखील हा शिधा मिळणार आहे.
- आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार.
- मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी.
- महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द.
- केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.
- सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा 2023 चा अध्यादेश मागे.
- दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
- मंडणगड येथे दिवाणी न्यायालय.
Ganeshotsav, Diwali ration of happiness for Rs 100; Shinde-Fadnavis government’s decision
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- भारताकडून ‘या’ देशाने मागवला १ लाख टन तांदूळ, टोमॅटो पाठवल्यानंतर केली ही विनंती!
- सारेगामापा लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनच्या केळवणाचा थाट ; मुग्धाने आजोळचा केळवण म्हणत शेअर केली पोस्ट
- सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात सर्वेक्षणावर तत्काळ बंदी घातली, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान