• Download App
    Ganesh Khankar Appointed BJP Group Leader in BMC; Amit Satam Announces Decision मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, अमित साटम यांनी केली घोषणा

    Ganesh Khankar : मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड, अमित साटम यांनी केली घोषणा

    Ganesh Khankar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Ganesh Khankar मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच भारतीय जनता पक्षाचा गटनेता अखेर ठरला आहे. अभ्यासू आणि अनुभवी नगरसेवक गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी वर्णी लागली आहे. महापालिकेच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव आणि विषयांची सखोल जाण असलेला चेहरा म्हणून खणकर यांच्याकडे पाहिले जाते. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या गटनेतेपदी निवडीची घोषणा केली.Ganesh Khankar

    गणेश खणकर हे मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आले आहेत. भाजपचे मुंबई महामंत्री म्हणून त्यांनी संघटनेत दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली आहे. महापालिकेच्या नियमावलीची सखोल माहिती आणि प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेला ‘अभ्यासू नगरसेवक’ अशी त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या खणकर यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी देऊन भाजपने निष्ठेचा सन्मान केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.Ganesh Khankar



    टँकर माफियांविरोधात आक्रमक लढा

    गणेश खणकर यांच्या निवडीमागे त्यांचे जनहितार्थ केलेले धाडसी कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. मुंबईत सक्रिय असलेल्या टँकर माफियांविरोधात खणकर यांनी सातत्याने आवाज उठवला असून, सामान्य नागरिकांना पाण्यासाठी होणारी लूट थांबवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांनी खणकर यांच्या या कार्याचे नेहमीच कौतुक केले असून, त्यांना या लढ्यात भक्कम पाठिंबा दर्शवला आहे.

    अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व

    गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा असून, महापालिकेतील विविध समित्यांचा आणि नियमावलींचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. आगामी काळात स्थायी समिती आणि महासभेच्या बैठकींमध्ये विरोधकांना तांत्रिक मुद्द्यांवर घेरण्यासाठी खणकर यांच्या अनुभवाचा भाजपला मोठा फायदा होणार आहे.

    भाजप आणि शिवसेना स्वतंत्र गट नोंदणी करणार

    गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी संवाद साधला. “भाजप आणि शिवसेना हे दोन्ही गट एकत्रितपणे कोकण भवन जातील आणि दोन्ही गटांची स्वतंत्र नोंदणी होईल, अशी माहिती अमित साटम यांनी दिली. भाजपच्या गटाची नोंदणी भाजप म्हणून करणार आहोत,” असे अमित साटम यांनी सांगितले.

    आमचा आक्षेप व्यक्तीला, पक्षाला नाही

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दर्शवला असून, त्यांच्यासोबत गट स्थापन करणार आहेत. यावरही अजित साटम यांनी प्रतिक्रिया दिली. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अजित पवार या तिघांच्या महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आहे. आमचा आक्षेप एका व्यक्तीवर होता, पक्षावर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना एकत्रितपणे गटाची नोंदणी करणार आहेत. पण आमचा व्यक्तीवर आक्षेप कायम असून, पक्षावर आक्षेप असण्याचे कुठलेही कारण नाही,” असेही अमित साटम म्हणालेत.

    मुंबईत महापौर कुणाचा?

    अमित साटम म्हणाले, “महायुतीच्या निवडून आलेल्या ११८ नगरसेवकांपैकी एक नगरसेविका मुंबईच्या महापौरपदी विराजमान होईल. महापौर भाजपचा होईल की, शिवसेनेचा हे महत्त्वाचे नाही. मुंबई मनपात भ्रष्टाचार विरहीत प्रशासन मिळायला हवे. मुंबईचा विकास व्हायला हवा. मुंबईची सुरक्षितता अबाधित राहायला हवी. या गोष्टी महत्त्वाच्या आहे. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.”

    शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले

    दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आपल्या २९ नगरसेवकांची गट नोंदणी करण्याची तयारी पूर्ण केली असून, अभ्यासू आणि विश्वासू नगरसेवक अमेय घोले यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    अमेय घोले यांची निवड करण्यामागे त्यांचा महापालिकेतील दांडगा अनुभव कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अमेय घोले हे गेल्या तीन टर्मपासून नगरसेवक म्हणून निवडून येत असून त्यांना पालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती आहे. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाते. तसेच अमेय घोले यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे.

    Ganesh Khankar Appointed BJP Group Leader in BMC; Amit Satam Announces Decision

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, राऊतांच्या टीकेला महत्त्व नाही

    विलीनीकरणाच्या Inside story तून फक्त शरद पवारांच्या घरातले आणि गटातलेच सगळे नेते लाभार्थी; मग story किती खरी, किती खोटी??

    राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत दोन्ही गटांची भांडाभांडी; पण पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप पुढे टाकली नांगी!!