• Download App
    गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा Ganesh Chaturthi on 19 September 2023 itself

    Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा

    Ganesh Chaturthi on 19 September 2023 itself

    • गणपति स्थापना 19 सप्टेंबर रोजीच

    प्रतिनिधी

    पुणे : गणेशोत्सवाची सुरुवात अर्थात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)19 सप्टेंबर 2023 रोजीच असल्याचा स्पष्ट खुलासा पंचांग कर्ते मोहन दाते यांनी केला आहे Ganesh Chaturthi on 19 September 2023 itself

    काही पंचांगाची गणित पद्धती भिन्न असल्यामुळे काही सणवार यामध्ये एक दिवसाचा फरक येत असतो आणि सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण उत्सव याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. परंतु, गणेश चतुर्थी संदर्भात त्यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

    तो असा :

    विनायक चतुर्थी निर्णय

    पूर्वदिने एकदेशेनमध्याह्नव्यापिनी परदिने संपूर्ण मध्याह्नव्यापिनी तदा परैव । तथा भौमवार योग प्रशस्ता (धर्मसिंधु, गणेश चतुर्थी निर्णय) 18 सप्टेंबर रोजी तृतीया समाप्ती दुपारी १२.४० असून दुसरे दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी १३.४५ आहे. वरील शास्त्रीय वचनाप्रमाणे 19 सप्टेंबर 2023 रोजी चतुर्थी संपूर्ण मध्याह्नव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे.



    (यापूर्वी 26-08-1998 रोजी अशीच परिस्थिती असताना याच पद्धतीने निर्णय केलेला होता.)

    शृंगेरीच्या पू. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि पू. गणेश्वर द्रविडशास्त्री यांनी डोंबिवली येथील सभेत पंचांग विषयक मत मतांतरे राहणार आहेत, म्हणून आपण जे पंचांग नेहमी वापरत आहात त्या प्रमाणे आचरण करावे असे सांगितलेले आहे.

    दाते पंचांग गेली अनेक वर्षे वापरत आहे. अचूक गणित आणि धर्मशास्त्रीय निर्णय असलेल्या दाते पंचांगाप्रमाणे कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, तसेच इतर अनेक कॅलेंडर्स, भारत सरकारचे राष्ट्रीय पंचांग, श्रीस्वामी समर्थ पंचांग, राजंदेकर पंचांग आदी पंचांगांमध्ये दिल्याप्रमाणे

    मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी अंगारक योगावर गणपति स्थापना करणे योग्य होईल. महाराष्ट्र , गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान , दिल्ली,पंजाब, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू इ प्रदेशात सर्वत्र 19 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवारी श्री गणेश चतुर्थी आहे.

    Ganesh Chaturthi on 19 September 2023 itself

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले