प्रतिनिधी
पुणे : गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. यंदा गणेश जन्मोत्सवावर अनेक शुभमुहूर्त आहेत. जाणून घेऊ या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे?? पूजा करण्याची पद्धत काय आहे आणि कोणत्या मंत्राने गणपतीची पूजा करावी?? ganesh chaturthi 2022 This is the auspicious time muhurt
गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थीच्या दिवशी, शुभ वेळ सकाळी 6.00 ते 9.00, सकाळी 10:30 ते दुपारी 02, दुपारी 03:30 ते 05, संध्याकाळी 06 ते 07 पर्यंत आहे. या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा उत्तम काळ म्हणजे सकाळी 11.00 ते दुपारी 1.20.
पाच दुर्मिळ योग
1. वार तिथी आणि नक्षत्र संयोग: यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून ते सर्व योग आणि योगायोग तयार होत आहेत जे गणेशाच्या जन्माच्या वेळी तयार झाले होते.
2. लंबोदर योग: गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जातो. यंदा गणेश उत्सवावर दुर्मिळ लंबोदर योग घडत आहे. हा योग 300 वर्षांनंतर तयार होत आहे म्हणून त्याला लंबोदर योग म्हणतात.
3. राजयोग: यावेळी गणेश चतुर्थीला लंबोदर योगासह वीणा, वरीष्ठ, अभयचारी आणि अमला हे गणेशाच्या जन्माच्या वेळी राजयोग बनत आहेत.
4. रवि योग: यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 5:38 ते दुपारी 12:12 पर्यंत, रवियोगासह शुक्ल योग तयार होत आहे.
5. ग्रहयोग: गणेश चतुर्थीच्या दिवशी चार ग्रह आपापल्या राशीत राहतील. मीन राशीत गुरु, मकर राशीत शनि, कन्या राशीत बुध आणि सिंह राशीत सूर्य शुभ योग निर्माण करत आहे.
अशी करा गणेश पूजा
गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान करून नवीन पाट घेऊन गंगाजलाने शुद्ध करा. यानंतर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर गणपतीची मूर्ती बसवावी.
गणेशाच्या मूर्तीवर फुलाने गंगाजल सिंचन करावे. मूर्ती मातीची असल्याने फार पाणी घेऊन सिंचन करू नये अन्यथा मूर्ती खराब होईल. मूर्तीच्या बाजूला एक सुपारी ठेवा. या सुपारीचीच गणेश रुपी पूजा करावी. गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवावा.
अथर्वशीर्ष पठणाने गणेश रुपी सुपारीवर जलाभिषेक करावा. गणेशाला प्रिय असलेले जास्वंदाचे फुल, दुर्वा, शमीपत्र, कमळ, केवडा, पुष्पहार भक्तीयुक्त अंतःकरणाने अर्पण करावेत.
गणेश मूर्तीचा चेहरा, सोंड झाकले जाईल अशा पद्धतीने कोणतेही फुल अथवा पत्री वाहू नये. पत्री गणपतीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला वहावी.
गणपतीची पूजा करताना ‘ओम गणपतये नमः’ या मंत्राचा जप करावा. श्रीगणेशाची आराधना केल्याने आपल्या घरात सदैव प्रसन्नता राहते.
पूजन पूर्ण झाल्यानंतर 21 मोदकांचा महानैवेद्य दाखवून श्री गणेशाची आरती करावी.
ganesh chaturthi 2022 This is the auspicious time muhurt
महत्वाच्या बातम्या
- मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे युद्ध पातळीवर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- सोनिया गांधींच्या PAवर बलात्काराचा आरोप : पीडिता म्हणाली- केस मागे घेण्यासाठी धमक्या मिळाल्या; तपास अधिकारीही बदलले
- विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन
- अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!