• Download App
    गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा आहेर; गोरेगावच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन!!, समेटाचाही सल्ला!! Gajanan Kirtikar's envy of Thackeray

    गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना घरचा आहेर; गोरेगावच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन!!, समेटाचाही सल्ला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने गोरेगाव येथील एनसीपीएच्या मैदानावर शिवसैनिकाच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला खरा, पण त्या मेळाव्याला शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या उठावाच्या निर्णयाचे समर्थन करून ठाकरे गटाला घरचा आहेर दिला गजानन कीर्तिकर हे प्रकृती अस्वास्थ्य असूनही मेळव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यावेळी बोलताना कीर्तिकर यांनी चक्क शिंदे यांनी केलेली युती नैसर्गिक आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाला घराचा अहेर दिला. Gajanan Kirtikar’s envy of Thackeray

    आता समेट करा

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडून भाजपाशी युती करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यात उद्धव ठाकरे यांचा गट कमकुवत बनला आहे. त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक आली आहे. अशा वेळी मुंबईवर मागील २५ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेची सत्ता जाईल का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने तातडीने गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यामध्ये जेष्ठ शिवसैनिक, नेते गजानन कीर्तिकर हेही उपस्थित होते.


    Shivsena – AAP : राणा दाम्पत्य – शिवसेना संघर्षात आम आदमी पार्टी शिवसेनेच्या पाठीशी!!


    खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हटले की, आता समेट करा. किती वर्षे हे भांडण चालणार? २-३ वर्षे तुम्ही एकमेकांची डोकी फोडणार, त्यापेक्षा समेट करा. एकत्र येऊ या. शिंदेंनी जी युती केली आहे ती नैसर्गिक आहे. २०१९ च्या निवडणुकीत युती करूनच निवडणूक लढलो होतो आणि पुढची वाटचाल राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत होता कामा नये, हे आमचे ठाम म्हणणे आजदेखील आहे, असेही नेते कीर्तिकर म्हणाले.

    Gajanan Kirtikar’s envy of Thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!