• Download App
    Gajanan kirtikar "डॉक्टर" गजानन कीर्तिकरांनी तपासली "नाडी"; शिवसेना एकसंध न होण्यामागे "अदृश्य शक्ती"; पण त्या "अदृश्य शक्तींवर" करायची जबाबदारी कुणाची??

    “डॉक्टर” गजानन कीर्तिकरांनी तपासली “नाडी”; शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्ती”; पण त्या “अदृश्य शक्तींवर” मात करायची जबाबदारी कुणाची??

    नाशिक : शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्तींचा हात असल्याचे सांगून “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या राजकीय दुखण्याचे अचूक निदान केले, पण त्या निदानापलीकडे जाऊन ज्या “अदृश्य शक्ती” शिवसेना एकसंध होण्यात अडथळा आणत आहेत, त्यांच्यावर मात करायची जबाबदारी कुणाची??, हे मात्र “डॉक्टर” गजानन किर्तीकर यांनी सांगितले नाही.

    “डॉक्टर” गजानन कीर्तिकर यांनी जरी शिवसेना एकसंध न होण्यामागे “अदृश्य शक्ती” आहेत, असे निदान करताना त्यांचे नाव घेतले नसले, तरी त्या “अदृश्य शक्ती” कोण??, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण त्या “अदृश्य शक्तींची” खरी शक्तीच शिवसेना दुभंगण्यात दडली आहे. शिवसेना दुभंगली नसती आणि ती एकच राहिली असती, तर आज अफाट वाढलेल्या “अदृश्य शक्तींची” राजकीय शक्ती मूळात वाढलीच नसती, ती फक्त शाखांवर कवायत करण्यात आणि बौद्धिके ऐकण्यात वाया गेली असती.



    – मूळात शिवसेना फुटण्यामागे अदृश्य शक्ती नाही

    पण तरी देखील शिवसेना आरंभापासून फुटण्यात या “अदृश्य शक्तींचा” हात होता, असे मानायला मात्र बिलकुल वाव नाही. कारण आजची “अदृश्य शक्ती” तेव्हा अतिशय क्षीण अशीच “शक्ती” होती. जी शक्ती स्वतःच उभी राहू शकत नव्हती, ती इतरांना काय क्षीण करणार हा खरं त्यावेळी प्रश्न होता, पण ज्या दुसऱ्या “दृश्य शक्तीच्या” नादी लागून उद्धव ठाकरेंनी टप्प्याटप्प्याने शिवसेना स्वतःहून फोडली, राज ठाकरे, नारायण राणे, रामदास कदम अशा एकेका मोठ्या नेत्याला बाहेर काढले, त्यावेळी तर “डॉक्टर” गजानन कीर्तिकर यांच्या मनात असलेली “अदृश्य शक्ती” बिलकुलच शिवसेनेच्या फुटीला कारणीभूत नव्हती. कारण तेवढी तिची खरी “शक्तीच” नव्हती.
    2014 नंतर “अदृश्य शक्तीच्या” “शक्ती” मध्ये अचानक वाढ झाली. कारण त्यांच्याकडे ब्रँड असलेला नेता आला. त्याचवेळी शिवसेनेचा मुख्य ब्रँड बाळासाहेब ठाकरे नावाचा सूर्य अस्तंगत झाला होता.

    – “दृश्य शक्तीच्या” नादी लागून शिवसेनेचे नुकसान

    पण 2019 मध्ये “अदृश्य शक्ती” आणि अखंड शिवसेना यांच्या महायुतीला महाराष्ट्र राज्य जनतेने कौल दिला, त्यानंतर ज्या “दृश्य शक्तीच्या” नादी लागून उद्धव ठाकरेंनी महायुतीतून पोबारा केला, त्या “दृश्य शक्ती” बद्दल “डॉक्टर” गजानन कीर्तीकर यांनी कुठलेच निदान केले नाही. वास्तविक 2019 मध्ये पवार नावाच्या “दृश्य शक्तीच्या” नादी लागून उद्धव ठाकरे शिवसेनेचे कायमचे नुकसान करून घेतले आणि म्हणूनच आता ठाकरे बंधू एकत्र येऊन ठाकरे ब्रँड सावरण्याची वेळ आली. पण हे बोचणारे आणि खोचणारे सत्य गजानन कीर्तिकर यांनी सांगितले नाही.

    त्यामुळे “डॉक्टर” गजानन कीर्तिकर यांचे “अदृश्य शक्ती” विषयीचे निदान अचूक असले, त्याला मर्यादा आहेत आणि त्यावरची उपाययोजना करणे “डॉक्टर” कीर्तीकरांच्या हातात नाही. कारण “अदृश्य शक्तीवर” मात करण्याची जबाबदारी ही ठाकरे बंधूंवरच आहे. ती इतर कुणावर नाही. किंबहुना “दृश्य शक्तीच्या” नादी न लागता जर ठाकरे बंधू खरंच एकत्र आले, तर मात्र “दृश्य” आणि “अदृश्य” असल्या दोन्ही शक्तींवर मात करण्याची क्षमता शिवसैनिक आणि मनसैनिक त्यांना देतील याविषयी कुणी शंका बाळगायचे कारण नाही.

    Gajanan kirtikar blames invisible power against unification of Thackrey brothers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पोरं टोरं पण देऊ लागली “आवाज”; नगरपंचायती टिकवायला भाजपच्या कुबड्यांना लागतोय दुसऱ्या कुबड्यांचा आधार!!

    मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारला कुठलीही क्लीन चिट नाही; पोलीस डायरीतल्या नोंदी काय सांगतात??

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर; दोन्हीकडे “पवार संस्कारितांची” भांडणे उघड्यावर!!