Monday, 5 May 2025
  • Download App
    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!Gains for Congress in Sharadnisht vs Ajitish NCP struggle

    शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या संघर्षात काँग्रेसला लाभ; भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा राजकीय संघर्ष रंगत असताना त्याचा मोठा लाभ काँग्रेसला होताना दिसत आहे. काँग्रेसने या संघर्षाचा फायदा उठविण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत आणि मतदारांनी देखील त्याला अनुकूल प्रतिसाद करून दिला आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्या नंबरच्या भाजपशी टक्कर घेताना काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाल्याचे सकाळ साम सर्वेक्षणाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. Gains for Congress in Sharadnisht vs Ajitish NCP struggle

    शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरून घसरून पाचव्या क्रमांकावर गेली आहे, तर राष्ट्रवादीत देखील आता शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ या संघर्षात मूळ पक्षाची घसरण झाली आहे आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांवर मात करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

    भाजपला 26.8% मतदारांनी कौल देतानाच काँग्रेसला 19.9% मतदारांनी कौल दिला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीतल्या संघर्षाचा लाभ थेट काँग्रेसला झाला आहे आणि काँग्रेसने त्या दृष्टीने पावले देखील उचलली आहेत.

    लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर जाण्याची तयारी करून 21 जागा निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्या दृष्टीने संघटनेची पुनर्बांधणी सुरू केली आहे. सकाळच्या सर्वेक्षणात मतदारांनी देखील काँग्रेसला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.


    पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; प्रमुख पाहुणे शरद पवार, NCPच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर


    लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदारसंघातील 73330 मतदारांच्या सर्वेक्षणात भाजपने अव्वल स्थान पटकावले आहे.

    •  भाजप 26.8 %
    •  काँग्रेस 19.9 %
    •  शरदनिष्ठ राष्ट्रवादी 14.9 %
    • अजितनिष्ठ राष्ट्रवादी 5.7 %
    •  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 12.7 %
    •  एकनाथ शिंदे शिवसेना 4.9 %
    •  मनसे 2.8 %
    •  वंचित बहुजन आघाडी 2.8 %

    वर उल्लेख केलेल्या टक्केवारीनुसार मतदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत कौल दिला, तर भाजप महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणेल, त्याचवेळी शरद पवारांच्या प्रभावाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिछाडीवर ढकलत मूळ काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे दिसत आहे.

    Gains for Congress in Sharadnisht vs Ajitish NCP struggle

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा