Tuesday, 6 May 2025
  • Download App
    नगरमधल्या एकत्र कार्यक्रमानंतर गडकरी - पवारांची आपापल्या पक्षांसाठी स्वतंत्र "राजकीय पेरणी" |Gadkari-Pawar's separate "political sowing" for their respective parties after a joint function in the city

    नगरमधल्या एकत्र कार्यक्रमानंतर गडकरी – पवारांची आपापल्या पक्षांसाठी स्वतंत्र “राजकीय पेरणी”

    विशेष प्रतिनिधी

    नगर : नगर मध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधणीच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित हजेरी लावल्यानंतर दोन्ही नेत्यांनी दुसऱ्या कार्यक्रमांमधून आपापल्या पक्षांसाठी आज स्वतंत्र “राजकीय पेरणी_ करून घेतली.Gadkari-Pawar’s separate “political sowing” for their respective parties after a joint function in the city

    शरद पवार हे गडकरींबरोबर कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शरद पवार पुण्याला परतत असताना वाटेत पारनेरला आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. तेथे त्यांचे आगत-स्वागत झाले.



    निलेश लंके यांच्याकडे राष्ट्रवादी नगरचे पुढचे लोकसभेचे उमेदवार म्हणून पहात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अर्थातच नगरचे विद्यमान भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी हा राजकीय धोका असल्याचा संदेश पवार यांनी दिला आहे.

    त्याच वेळी नितीन गडकरी यांनी नगरचे आधीचे खासदार कै. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यांनी दिलीप गांधी यांच्या दोन पुत्रांशी आणि पत्नीशी संवाद साधला. दिलीप गांधी यांचे कुटुंबीय मध्यंतरी भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. परंतु गडकरी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अनेकदा दिलीप गांधी यांच्या विकासाच्या दृष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

    नगर जिल्ह्याच्या विकासासाठी दिलीप गांधींचे योगदान भाजप विसरणार नाही, अशी खात्री दिली. त्यानंतर त्यांनी दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यामुळे विखे पाटील आणि गांधी परिवाराचे राजकीय मनोमिलन झाल्याचेही मानले जात आहे.

    नितीन गडकरी आणि शरद पवार हे दोन वरिष्ठ नेते नगरच्या एका कार्यक्रमात जरी एकत्र आले असले, तरी त्या निमित्ताने त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी या आपापल्या पक्षांसाठी या नगर दौऱ्याच्या निमित्ताने स्वतंत्र “राजकीय पेरणी” करून घेतली असे मानले जात आहे.

    Gadkari-Pawar’s separate “political sowing” for their respective parties after a joint function in the city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस