प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना भाजपचे सर्वोच्च निर्णायक संसदीय मंडळातून वगळण्यात आले आहे. पण वगळण्यात आलेले ते एकटेच नेते नसून त्यांच्याबरोबर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील वगळण्यात आले आहे. पण गडकरींचे हे वगळणे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र सर्वाधिक टोचलेले दिसत आहे. Gadkari dropped from BJP parliamentary board; NCP injected Special
गडकरींना संशय मंडळातून वगळणे अथवा ठेवणे हा सर्वस्वी भाजपचा अंतर्गत विषय आहे तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो यांनी एक ट्विट करून गडकरींना “पाठिंबा” व्यक्त केला आहे. कोणत्याही पक्षात केंद्रीय नेतृत्वाकडे आव्हान उभे केले की संबंधित नेत्याचे असेच खच्चीकरण केले जाते. थोडक्यात पंख कापले जातात, असे क्लाइड क्रॅस्टो यांचे म्हणणे आहे.
बाकीच्या कोणाही पेक्षा गडकरींना संसदीय मंडळातून वगळणे हे राष्ट्रवादीला टोचणे हा मुद्दा देखील स्वाभाविक आहे. कारण गडकरी हे कोणत्याही पदावर असले तरी ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने शरद पवारांच्या जवळचे मानले जातात. किंबहुना गडकरी हे भाजप मधले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे शरद पवारांचे “चॉईस” होते, असे मानले जाते. पण गडकरींना हे पद काही लाभले नाही. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. केंद्रीय मंत्रीपण झाले. पण महाराष्ट्राचे पवारांचे चॉईस असलेले मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेले नाही.
गडकरींऐवजी मोदी – शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर आणि आता उपमुख्यमंत्री पदावर “पसंत” केले आहे. पवारांशी असलेली जवळीक राजकीय जवळीक गडकरींना हो नडल्याचे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते. अर्थातच गडकरींचे संसदीय मंडळातून वगळले जाणे त्यामुळेच राष्ट्रवादीला टोचले असावे, असे दिल्लीतल्या राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Gadkari dropped from BJP parliamentary board; NCP injected Special
महत्वाच्या बातम्या
- Bhandara Flood Updates : भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत 3 हजाराहून अधिक पूरग्रस्तांची प्रशासनाकडून व्यवस्था
- पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८, तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद
- पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या
- विधान परिषदेच्या सभापतीपदाची लढाई…; पण त्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी!!