प्रतिनिधी
मुंबई : सध्या भारतात सुरू असलेल्या जी 20 परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी सोमवारी रात्री मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियाला भेट दिली. यावेळी येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास दाखवणारा लाईट अँड साऊंड शो देखील आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्राची संस्कृती पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले होते. G 20 representatives experienced light and sound show of bravery of chatrapati Shivaji maharaj
जी 20 च्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची तिसरी बैठक सोमवारी झाली. त्यानंतर या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जी 20 परिषदेनिमित्त आलेल्या विविध देशांतील प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दही हंडी, ढोल-ताशा आणि लावणी आदींचा समावेश होता. या निमित्ताने या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेता यावा, यासाठी विशेष लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतींवर प्रोजेक्ट करून शिवरायांचा पराक्रमी जीवनप्रवास दाखवण्यात आला. विदेशी पाहुण्यांना ढोल-ताशाची भुरळ पडली. त्यांनी पारंपारिक मराठी नृत्यामध्ये सहभागी होत ढोल आणि ताशा वाजवून पाहिला.
श्रीनगरमध्येही बैठक
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे सोमवारी मोठ्या बंदोबस्तामध्ये जी 20 संमेलनाला सुरुवात झाली. त्यातील काही प्रतिनिधींनी श्रीनगरच्या दल सरोवरामध्ये शिकारा सवारीचा आनंद घेतला. 2019 मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. या शिकारा सवारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
G 20 representatives experienced light and sound show of bravery of chatrapati Shivaji maharaj
महत्वाच्या बातम्या
- बँकांमधून आजपासून 2000 च्या नोटा मिळणार बदलून, पण धावपळीची गरज नाही; रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा निर्वाळा
- 2000 ची आणण्याच्या बाजूने नव्हते मोदी, साठेबाजीचा सांगितला होता धोका, इच्छा नसूनही द्यावी लागली होती परवानगी
- मुख्यमंत्री हिमंता यांचा दावा, आसाममधून यावर्षी ‘AFSPA’ हटवण्यात येईल
- थोरला नाही, धाकटा नाही, भाऊबंदकी चालणार नाही; महाविकास आघाडीत काँग्रेसचा नवा मेरिट फॉर्म्युला!!