पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. Funeral will be held at Vaikuntha Cemetery on Babasaheb Purandare
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी 100व्या वर्षी आज पुण्यात अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवचरित्रकार, ज्येष्ठ इतिहासकार, अशी बाबासाहेब पुरंदरे यांची ओळख होती.
महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरवदेखील केला होता. पण त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संपुर्ण राज्यावर शोकाकुळ पसरला आहे.