• Download App
    म्हैसाळच्या 9 जणांच्या हत्याकांडाची पूर्ण कहाणी : गुप्तधनासाठी तांत्रिकाला बोलावले, त्यानेच सर्वांना विषारी चहा दिला|Full story of the murder of 9 people in Mahisal Tantric was called for secret money, he gave poisonous tea to everyone

    म्हैसाळच्या 9 जणांच्या हत्याकांडाची पूर्ण कहाणी : गुप्तधनासाठी तांत्रिकाला बोलावले, त्यानेच सर्वांना विषारी चहा दिला

    प्रतिनिधी

    सांगली : 20 जून रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांचे मृतदेह सापडले होते. म्हैसाळ गावातील दोन भावांच्या कुटुंबात हे मृत्यू झाले. कुटुंब कर्जबाजारी होते, त्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर आली होती. तथापि, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा कुटुंबाला तांत्रिक आणि त्याच्या ड्रायव्हरने विष पाजल्याचे समोर आले.Full story of the murder of 9 people in Mahisal Tantric was called for secret money, he gave poisonous tea to everyone

    त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अब्बास मोहम्मद अली बागवान हा त्याचा चालक धीरज चंद्रकांत सुरवशे याच्यासोबत 19 जून रोजी म्हैसाळ गावातील वनमोरे बंधूंच्या घरी पोहोचला. येथे तांत्रिकाने गुप्त खजिना शोधण्याचे आमिष दाखवून तंत्र-मंत्र सुरू केला.



    यादरम्यान कुटुंबातील सर्व 9 सदस्यांना घराच्या छतावर पाठवण्यात आले. त्याने त्यांना एक-एक खाली बोलावून चहा प्यायला सांगितले. दोन्ही भावांची कुटुंबे शेजारील घरात राहत होती. त्यापैकी एक शिक्षक आणि दुसरा पशुवैद्यकीय डॉक्टर होता.

    सकाळी उशिरापर्यंत दार न उघडल्याने ग्रामस्थांना शंका

    दोन्ही भावांचे कुटुंबीय नेहमी सकाळी लवकर जागे व्हायचे, मात्र त्या दिवशी उशिरापर्यंत दोन्ही घरांचे दरवाजे न उघडल्याने ग्रामस्थांना संशय आला. यावेळी शेजाऱ्यांनी कुटुंबीयांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कोणीही कॉलला उत्तर न दिल्याने काहीतरी अनुचित प्रकार घडल्याच्या भीतीने डोकावून पाहिले. यादरम्यान कुटुंबातील सर्व सदस्य मृतावस्थेत दिसले आणि लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

    आर्थिक अडचणीत होते कुटुंब

    आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीय अनेक दिवसांपासून तणावाखाली असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. दोन्ही भावांनी अनेक लोकांकडून कर्जही घेतले होते. त्यामुळे कर्ज फेडण्याच्या दबावाखाली त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

    या हत्याकांडात आक्काताई वनमोरे (७२), पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), संगीता पोपट वनमोरे (४८), रेखा माणिक वनमोरे (४५), अर्चना पोपट वनमोर (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), अनिता माणिक वनमोरे (२८), आदित्य माणिक वनमोरे (१५) यांचा मृत्यू झाला.

    Full story of the murder of 9 people in Mahisal Tantric was called for secret money, he gave poisonous tea to everyone

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा