• Download App
    |शिवसृष्टी उभारण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची इच्छा लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची सरकारला विनंतीFulfill Babasaheb Purandare's wish to build Shiv Srishti soon; Udayan Raje's request to the government

    शिवसृष्टी उभारण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची इच्छा लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची सरकारला विनंती

    प्रतिनिधी

    पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगना एवढ्या कर्तृत्वाचे स्मरण सर्वांना राहावे यासाठी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला. ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सरकारला केली आहे.Fulfill Babasaheb Purandare’s wish to build Shiv Srishti soon; Udayan Raje’s request to the government

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही आज पुण्यात बाबासाहेबांच्या पर्वती इथल्या घरी येऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घे घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. उदयनराजे म्हणाले, की ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातले एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत.



    त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली न भरुन येणारी ही पोकळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलेलं आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

    याबरोबरच त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एक इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही सरकारकडे केली. उदयनराजे म्हणाले, की त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातल्या शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली.

    राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसेच जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचे शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा.

    Fulfill Babasaheb Purandare’s wish to build Shiv Srishti soon; Udayan Raje’s request to the government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस