विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात शुगर बीटपासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. गुरुपौर्णिमा व वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून कृषी विकास प्रकल्पावर शुगर बीटपासून इथेनॉल उत्पादन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मराठा मंगल कार्यालयामध्ये शिबिराचे आयोजित केले. या विषयातील तज्ञ वासुदेव तोताडे यांनी मार्गदर्शन केले. From sugar beets Production of Ethanol
भारत हा जगात तीन नंबरचा तेल आयात करणारा देश आहे. बजेटमधील सर्वात जास्त पैसा तेल आयातीवर खर्च होतो . त्यामुळे भारत सरकारने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प भारतात उभे करण्यासाठी २०२३ पर्यत ७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. भविष्यात ही योजना सफल झाली तर विदेशातून आयात होणारे तेल २० टक्केने कमी होऊ शकते . तर या इथेनॉल निर्मिती च्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा होऊ शकतो.
- शुगर बीटपासून इथेनॉलची निर्मितीचा प्रकल्प
- परदेशी तेल आयात कमी करण्याचा प्रयत्न
- आत्मनिर्भर भारत अंतर्गत साकारणार
- भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे प्रकल्प
- शुगर बीटचे 20 ते 25 टन एकरी उत्पन्न शक्य
- अकोला येथील तज्ञ वासुदेव तोताडे यांचे मार्गदर्शन