• Download App
    पवारांच्या ट्विटमधून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला डच्चू; फक्त व्यंगचित्रकला आणि मराठीच्या स्वाभिमानाचा केला उल्लेख!!|From Pawar's tweet, Balasaheb's Hindutva will be damaged; Only satire and self respect of Marathi was mentioned!!

    पवारांच्या ट्विटमधून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला डच्चू; फक्त व्यंगचित्रकला आणि मराठीच्या स्वाभिमानाचा केला उल्लेख!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा “सिलेक्टिव्ह” इतिहास समोर आणला आहे. एकेकाळच्या राजकीय वैऱ्याला श्रद्धांजली वाहताना शरद पवारांनी बाळासाहेबांची व्यंगचित्रकला आणि मराठी माणसाचा स्वाभिमान एवढे दोनच उल्लेख करून बाळासाहेबांचे प्रमुख तत्व हिंदुत्व हेच आपल्या ट्विटमधून गायब केले आहे.From Pawar’s tweet, Balasaheb’s Hindutva will be damaged; Only satire and self respect of Marathi was mentioned!!



    बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. महाराष्ट्रासह देशात हिंदुत्वाचा अंगार पेटवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. बाबरी मशिदीच्या जागी भव्य राम मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्न कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. त्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये आवर्जून केला. परंतु शरद पवारांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा आपल्या ट्विटमध्ये बिलकुलच उल्लेख केलेला नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्व त्यांच्यापासून वगळून टाकले आहे.

    शरद पवारांचे ट्विट असे :

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक प्रश्नांवर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून भाष्य करणारे एक कुशल व्यंगचित्रकार होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात त्यांनी एक धगधगता स्वाभिमान जागृत केला. मराठी माणसाच्या हितासाठी नेहमीच रोखठोक भूमिका घेणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

    या ट्विट मधून पवारांनी बाळासाहेबांचा फक्त “सिलेक्टिव्ह” इतिहास समोर आणला आहे. कारण बाळासाहेबांनी ज्यावेळी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली होती, त्यावेळी पवार महाराष्ट्रात सत्ताधारी होते पवारांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसवर बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी भूमिकेच्या आधारेच मात केली होती. पवारांच्या पक्षांचा पराभव केला होता. हा इतिहास पवारांना डांचत असल्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादाचा इतिहास लपवण्याचा पवारांनी आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रयत्न केला. फक्त त्यांच्यातल्या व्यंगचित्रकाराला आणि मराठी माणसाच्या मुद्द्याला उचलून धरत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

    From Pawar’s tweet, Balasaheb’s Hindutva will be damaged; Only satire and self respect of Marathi was mentioned!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!