१५ ते १८ वयोगटातील मुलांना १ जानेवारी २०२२ पासून CoWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे.From January 1, children will be able to register for vaccination on CoWIN
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाता आता १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याची नुकतीच घोषणा केली.यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांना १ जानेवारी २०२२ पासून CoWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले की , “१५ ते १८ वयोगटातील मुलं १ जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र असतील.
यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्रासाठी १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे.याच महत्वाचं कारण म्हणजे काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं. त्यामुळं त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे”
अशी आहे लस नोंदणी प्रक्रिया
१) सर्व प्रथम Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
२)यानंतर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
३) आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
४) सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाकल्यानंतर लसीकरण केंद्रांची यादी येईल.
५) आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
६)लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रिफ्रेन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.
७)त्याचप्रमाणे, आपण आपल्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.
From January 1, children will be able to register for vaccination on CoWIN
महत्त्वाच्या बातम्या
- सोन्याला आणखी झळाळी मिळणार, दर वाढण्यास पोषक वातावरण
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार? राज्यपाल अभ्या करून निर्णय देणार, राऊत म्हणतात – इतका अभ्यास बरा नाही, झेपलं पाहिजे!
- NASHIK IT RAID : 240 कोटींचे घबाड ! नाशिक धुळे-नंदुरबारमध्ये छापे ;175 अधिकारी-22 गाड्यांचा ताफा-मौल्यवान हिरे-सोन्याची बिस्कीटे;पैसे मोजता मोजता मशीनही थकल्या
- लाईफ स्किल्स : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आजूबाजूकडून शिका