प्रतिनिधी
मुंबई : हिंदू व्होट बँक आज तयार झालेली नाही. तिचा इतिहास फार मागे न्यावा लागेल. संत-महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंची व्होट बँक तयार केली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला, असे वादग्रस्त विधान चंद्रकांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.From Hindu Vote Bank to Chandrakant Dada – Sanjay Raut
या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादळ उसळले असून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठविण्यात येत आहे. एक प्रकारे शिवसेना-भाजपमध्ये हिंदू व्होट बँकेची खेचाखेची सुरू झाली आहे, तर त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांची घसरा घसरी देखील सुरू झाली आहे.
पक्षाच्या एखाद्या उमेदवाराने एखाद्या उमेदवाराचे तिकीट कापले त्यामुळे हा विजय झाला, असे नसते. तिकिटे पक्षाचे असते. आपला चेहरा फार थोड्या प्रमाणावर उपयोगी पडत असतो. निवडून येण्यासाठी तुम्हाला फक्त व्होट बँक लागते आणि हिंदू व्होट बँकेचा याचा इतिहास तपासायचा झाला तर तो फार मागे न्यावा लागेल. संत – महात्मे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत न्यावा लागेल, असे वक्तव्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केले होते.
त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. हिंदूंना हिंदू म्हणून मत द्यायला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांचा विचार आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराष्ट्रात रुजवला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू म्हणून मत द्यायला लावले. हे खुद्द प्रमोद महाजन यांनी देखील मान्य केले आहे. पण बाबरी मशीद पडली तेव्हा आज हिंदुत्वाचा गजर करणारे तेव्हा शेपूट घालून पळून गेले होते, अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचा समाचार घेतला आहे.
काँग्रेस – राष्ट्रवादी कडून टीकेची झोड!!
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू पुरते मर्यादित करण्याचे काम संघ आणि भाजपचे नेते करत आहेत. छत्रपतींचे राज्य रयतेचे राज्य होते त्यात मुसलमानही होते, असे सांगितले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपची विचारधारा सडकी असल्याची टीका केली आहे. छत्रपती शिवराय हे धर्माच्या आधारावर नव्हे तर रयतेचे राज्यकर्ते होते, असे ते म्हणाले आहेत. एकीकडे हिंदू व्होट बँकेच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खेचाखेची सुरू असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मात्र त्या दोघांवर जोरदार घसरताना दिसत आहेत.
From Hindu Vote Bank to Chandrakant Dada – Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- ब्रम्होस क्षेपणास्त्र आता थेट चीन सीमेवर पोहोचू शकणार, चार धाम महामार्गाच्या रुंदीकरणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
- निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षण मुद्यावरून घोळ, राज ठाकरे यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर आरोप