प्रतिनिधी
मुंबई : आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारवरच उलटल्याचे दिसून आल्यावर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला मोहरा फिरवत आता आमदारांना घरे मोफत मिळणार नाहीत तर त्या बदल्यात त्यांच्याकडून 70 लाख रुपये किंमत वसूल करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. Free houses for MLAs: Jitendra Awhad turned “Mohare” after public outrage !!; 70 lakh will be recovered !!
मुंबईबाहेरच्या सुमारे 300 आमदारांना घरे मोफत देण्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी काल विधानसभेत केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या आमदारांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला दुजोरा दिला.
सोशल मीडियातून भडिमार
परंतु सोशल मीडियातून महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर प्रचंड भडिमार झाला. जनतेच्या कल्याणकारी योजनांना निधीअभावी वाटाण्याच्या अक्षता आणि आमदारांवर पगार, भत्ते, निधी आणि मोफत घरे यांची खैरात…!!, अशी जोरदार टीका सुरू झाली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून महाविकास आघाडी सरकारवर अक्षरश: तोफांचा भडिमार झाला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना आपली मूळ घोषणा मागे घ्यावी लागली आणि आज सकाळी त्यांनी ट्विट करून या घोषणेची सुधारणा सांगितली.
70 लाखांना घर
आमदारांना मोफत घरे देण्यावरून मोठा गदारोळ झाला असताना संबंधित घरे जागेची किंमत आणि बांधकाम खर्च असा 70 लाख प्रत्येक आमदाराकडून वसूल करण्यात येईल, असे त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. परंतु एकाच दिवसात ही महत्त्वाकांक्षी योजना महाविकास आघाडी सरकारवर बॅक फायर करून गेली ही वस्तुस्थिती दडून राहिली नाही.
Free houses for MLAs: Jitendra Awhad turned “Mohare” after public outrage !!; 70 lakh will be recovered !!
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : भारताची ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, सॉफ्टवेअरने वाढवली रेंज
- विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांचे लंडनच्या तुरुंगात शुभमंगल, स्टेला मॉरिसशी केला विवाह
- काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले