वृत्तसंस्था
नवी मुंबई : सध्या एलपीजी गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परंतु नवी मुंबईतील चिंचपाडा झोपडपट्टीत मोफत बायोगॅस मिळत आहे. महापालिकेने मलमुत्र आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला आहे. Free gas to 25,000 slum families, Biogas project in Navi Mumbai; The street lights were also on
नवी मुंब्ई महापालिकेने चिंचपाडा येथे बायोगॅसचा प्रकल्प उभा केल्याने रहिवाशांना फूकट घरगुती गॅस मिळू लागला आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील दिवेही बायोगॅसवर तेवत आहेत.
स्वच्छ भारत सर्वेक्षणात राज्यात पहिली आणि देशात तिसरी आलेली नवी मुंबई महापालिकेने वेगवेगळे पर्यावरणपूरक प्रकल्प राबवून नावलौकिक प्राप्त केला आहे. चिंचपाडा झोपडपट्टीतून निघणारे मलमुत्र आणि ऐरोली परिसरातील हॉटेलमधून येणारा ओला कचरा यांना एकत्र करून यातून बायोगॅस निर्मिती सुरू केली. हा बायोगॅस झोपडपट्टीतील घरांमध्ये मोफत दिला जात असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिन्याला गॅस सिलेंडरसाठी होणारा त्यांचा खर्च वाचू लागला आहे.
खासदार राजन विचारे यांचा फंड आणि खाजगी कंपन्याच्या सीएसआर फंडातून हा बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. दिवसाला ५ टन कचऱ्यातून बायोगॅस आणि ३०० युनिट विजेची निर्मिती केली जात आहे. यातून चिचंपाडा येथील झोपडपट्टीतील घरात मोफत गॅस दिला जात असून रस्त्यांवरील विजेचे दिवे पेटवले जात आहेत. आता २५ हजार घरांना मोफत घरगुती गॅस जोडणी जाणार आहे. सर्व ओला कचरा या प्रकल्पासाठी द्यावा, अशी मागणी नगरसेवक विजय चौगुले यांनी केली आहे.
चिंचपाडा झोपडपट्टीत बायोगॅस प्रकल्प सुरू केल्याने पर्यावरणपुरक फायदे होत आहेत. घरगुती गॅसची उपलब्धता, मोफत विज, ओला कचरा आणि मलमुत्राची विल्हेवाट लागली आहे. डंम्पिंग ग्राऊंड, एसटीपी प्लांटवरील भार कमी झाला. यामुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये बायोगॅस प्रकल्प सुरू करणार आहे.
– अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
Free gas to 25,000 slum families, Biogas project in Navi Mumbai; The street lights were also on
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व