Free Corona vaccine In Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोनावरील लस मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली. Free Corona vaccine In Maharashtra For Age 18 to 44 announced By CM Uddhav Thackeray today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोनावरील लस मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.
1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा
1 मेपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, 18 ते 44 वयोगटाला लसीकरणासाठी कोविन अॅप किंवा आरोग्य सेतूवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 28 एप्रिल रोजी संध्याकाळी चार वाजेपासून याकरिता नोंदणी सुरू झाली आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला आहे. मंगळवारी राज्यात 66 हजार 358 नवीन रुग्ण आढळून आले आणि सर्वाधिक 895 रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी 48,700 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात 18 एप्रिल रोजी सर्वाधिक 68,631 रुग्ण आढळले होते.
Free Corona vaccine In Maharashtra For Age 18 to 44 announced By CM Uddhav Thackeray today
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाविरुद्ध येणार फायझरचे ओरल औषध, वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याचा कंपनीचा दावा
- बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप
- परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण
- Corona Updates In India : भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे ३२९३ मृत्यू, ३.६० लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद
- भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण