विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून लॉकडाऊन करण्याची भूमिका घेतली. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले… France locked down for the third time But 120 120 billion measures were taken; Devendra Fadnavis’s reply to the Chief Minister
- हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. पण, त्यांनी युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला आहे.
- डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती… पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज दिले.
- ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत… पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत केली. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत केली.
- बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय. पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केले आहे.
- पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे. पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले आहे.
- आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत. पण, 7.4 बिलियन युरोचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिले आहे.
- फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत. पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिले आहे.
- युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिले आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा…!!
- विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
- होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत… आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची…!!