प्रतिनिधी
मुंबई : कोबाड घॅंडी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या अनुवादाला दिलेला सरकारी पुरस्कार मागे घेतल्यानंतर महाराष्ट्रात नक्षल समर्थक आणि नक्षलविरोधक यांच्यात जोरदार राजकीय घमासन सुरू आहे. अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे समर्थन आणि विरोध केला आहे. Fractured Freedom Controversy, a satirical punch on so called liberalism
प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य आपल्या वॉल वर एक विडंबन काव्य सादर केले आहे. ते असे :
कुणी भाव देत का रे? भाव?
थकलेल्या पुरोगाम्यांच्या व्यथेच्या वेदीवर मी वाहिलेली ही शब्दसुमने. वि. वा. शिरवाडकरांची क्षमा मागून हे काव्यपुष्प बरळकर आजोबा, आचार्य बाबा बर्वे, गेमाडे ह्यांच्यासारखे परतमुनी ह्यांना सादर अर्पण.
कुणी भाव देता का रे? भाव?
एका थकल्या-भागल्या विचारजंताला
कुणी भाव देता का? भाव?
एक पुरोगामी विचारजंत
फेसबुकच्या भिंती वरून,
शब्दांची वांती करून
फुटकळ सभांमध्ये भाषणे करून
टीव्ही वरती रडून रडून
वृत्तपत्रांना पत्रे लिहून
कडक हातभट्टीची पिऊन
सरकारी खिरापतीसाठी हिंडत आहे.
जिथे कुणी पुरस्कार परत घेणार नाही,
अशी जागा धुंडत आहे,
कुणी, भाव देता का रे? भाव?
खरच सांगतो बाबांनो
विचारजंत आता थकून गेलाय ,
सगळीकडे फुललेली कमळे पाहून ,
अर्धा-अधिक तुटून गेलाय
भव्य राममंदिर पाहताना
युपीमध्ये योगी सत्तेवर रहाताना
कलम ३७० हटताना
काँग्रेस पुरती सटपटताना
सेकुलरीजम मरताना
साम्यवाद सरताना
गुजरात भगवा होताना
महाराष्ट्र हातातून जाताना
डोळ्यादेखत पाहून पाहून
पुरोगामी आता बहकलाय
सरकारी सन्मानांना
पुरोगामी आता मुकलाय
राहुल गांधीच्या पदयात्रेत
चार पावले टाकून थकलाय
जळके विखारी फुत्कार टाकीत ,
म्हातारे पुरोगामी श्वापद खुरडत खुरडत रडतंय
खर सांगतो बाबांनो,
पुरोगाम्याला खोटं सेक्युलॅरीजमच नडतंय
हे.. बाबा.. कुणी भाव देता का रे? भाव?
पुरोगाम्याला आता सरकारी फ्लॅट नको,
(कारण तो आधीच मिळालाय)
कुणीतरी टाकलेले चाय-बिस्कुट नको
पद्मश्रीची खैरात नको
साहित्य संमेलनाची वरात नको.
हवे एक बंद पाकीट
म्हातारपणी व्हिस्कीची सोय करण्यासाठी
आणि एक नेमणूक तहहयात
कुठल्याही सरकारी महामंडळावर
अहंकाराचा कोटा भरण्यासाठी
एक हवे हक्काचे व्यासपीठ
कण्हत कुंथत करवादण्यासाठी
आणि एक निधर्मी सरकार
सुखाच्या साम्यवादी मरणासाठी !
कुणी भाव देता का रे, भाव?
एका थकल्या-भागल्या विचारजंताला
कुणी भाव देता का? भाव?
Fractured Freedom Controversy, a satirical punch on so called liberalism
महत्वाच्या बातम्या
- मुंबई – सॅनफ्रान्सिस्को थेट विमान सेवा सुरू; अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली – महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्र जोडणार
- FIFA Jihad : मोरोक्को हरल्यामुळे धर्मांध मुस्लिम दंगलीचे लोण फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड्स मध्ये पोहोचले
- जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच; वडिलांशी DNA झाला मॅच; आफताबचे होते आव्हान; दिल्ली पोलिसांना मोठे यश