• Download App
    भीषण दुर्घटना! पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार जणांचा मृत्यू, २२ जखमी! Four dead 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune Bengaluru Highway 

    भीषण दुर्घटना! पुण्यात नवले पुलाजवळ ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार जणांचा मृत्यू, २२ जखमी!

    जखमींवर स्थानिक रुग्णालया उपचार सुरू

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ मध्यरात्री ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. Four dead 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune Bengaluru Highway

    प्राप्त माहितीनुसार, हा अपघात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडला. जेव्हा कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने ट्रॅव्हल या मार्गाने जात होती. दरम्यान मालवाहू ट्रकने या बसला नवले पूलाजवळ जोरदार धडक दिली. यामुळे बस उलटली आणि बसमधील तीन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर २२ प्रवासी गंभीर जखमी झाले.

    दुर्घटनेतील जखमींनी तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या महामार्गावर कायमच दुर्घटना घडत असल्याने, प्रशासनाने काहीतरी ठोस उपाययोजना तातडीने करणे अत्यावश्यक आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

    पुणे-बंगळुरु महामार्गावरील कात्रज-नऱ्हे याठिकाणी अपघात घडल्याची माहिती मिळाली. मी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावे, यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अपघातात मृत पावलेल्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसेच अपघातातील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना करतो. अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

    Four dead 22 others injured in a collision between a truck and a private bus on Pune Bengaluru Highway

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??

    Icon News Hub