विशेष प्रतिनिधी
अमरावती : संपूर्ण देशासह जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. मात्र, हे गड किल्ले घडविणारा बेलदार समाज दुर्लक्षित असून मागे पडला आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र बेलदार ,भटकी जमात संघटनेचे अध्यक्ष राजीव साळुंके यांनी अमरावतीमध्ये केले.Fortes builder Beldar society ignored
बेलदार समाजाला अजूनही जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, घरकुल योजना पोचली नाही.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन बेलदार समाजाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केले.
- गड, किल्ले घडविणारा बेलदार समाज दुर्लक्षित
- अमरावतीत बेलदार समाजाचा मेळावा उत्साहात
- सरकारी योजनांचा लाभ समाजाला मिळवून द्यावा
- बेलदार समाज अजूनही जातीचे प्रमाणपत्र नाही
- घरकुल योजना समजपर्यंत पोचलेली नाही.
- मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन