• Download App
    माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची गोळी झाडून आत्महत्या! Former Union Minister Shivraj Patil Chakurkar brother committed suicide by shooting himself

    माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची गोळी झाडून आत्महत्या!

    परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स्ट मेसेज केला होता

    प्रतिनिधी

    माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय-८१) हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू आहेत. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागत ते राहत होते.Former Union Minister Shivraj Patil Chakurkar’s brother committed suicide by shooting himself!

    आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स्ट मेसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

    Former Union Minister Shivraj Patil Chakurkar brother committed suicide by shooting himself!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक