विशेष प्रतिनिधी
सोलापूर : हे कसले ग्रेट मराठा, यांच्या कार्यकाळात कधीही मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली नाही. शरद पवार यांनी मराठा आरक्षण बाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलनाची नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, येत्या काही महिन्यात राज्यात सत्तांतर झाले तरी आम्ही चार जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढणार आहोत’ Former MLA Narendra Patil criticizes Sharad Pawar for not taking a stand on Maratha reservation during his tenure
शरद पवार यांचा काळ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार द ग्रेट मराठा असे म्हटले जात होते. मात्र या काळातच मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यांनी ती स्पष्ट करावी आणि मराठा समाजाच्या मनात असलेला संभ्रम दूर करावा.
यापूर्वी बोलताना पाटील म्हणाले होते की शरद पवार राजकारणातील चाणक्य समजले जातात. त्यांना माहीत नाही असा कोणताही प्रश्न देशात नाही. मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते इतके उदासीन का आहेत?
आज पर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने एकही ठोस विधान केले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मनात संशय आहे. गेल्यावेळी मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते, त्यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते कोणाच्या तरी मागे लपत आहेत. त्यांना या प्रश्नाचे राजकारण करायचे आहे
Former MLA Narendra Patil criticizes Sharad Pawar for not taking a stand on Maratha reservation during his tenure
महत्त्वाच्या बातम्या
- OBC Reservation : कोरोनामुळे पोटनिवडणुका पुढे ढकलण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यावर संभाजीराजेंनी सांगितले शेवटचे दोन पर्याय
- संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हायला नको होती, कितीही आपटा, जिंकणार आम्हीच!